शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

‘केडीएमसी’च्या तिन्ही समित्यांत मनसेचे प्रतिनिधी; शिंदेसेनेच्या शिवआघाडीला पाठिंबा दिल्याची मिळाली बक्षिसी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:48 IST

शिंदेसेनेला पाठिंबा देणाऱ्या  मनसेला तिन्ही समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर उद्धवसेनेचा  प्रत्येकी एक प्रतिनिधी तिन्ही समित्यांवर नियुक्त झाला आहे. 

कल्याण : कल्याण - डाेंबिवली महापालिकेच्या स्थायी, महिला व बालकल्याण आणि शिक्षण समितीच्या  सदस्यांची सोमवारी महासभेत नियुक्ती करण्यात आली. शिंदेसेनेला पाठिंबा देणाऱ्या  मनसेला तिन्ही समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर उद्धवसेनेचा  प्रत्येकी एक प्रतिनिधी तिन्ही समित्यांवर नियुक्त झाला आहे. 

मनसेने उद्धवसेनेबरोबर युती करून पालिका निवडणूक लढविली. मात्र, निवडणुकीनंतर शिंदेसेनेच्या शिवआघाडीत मनसेचे ५ नगरसेवक सहभागी झाले. त्यामुळे स्थायी, महिला व बालकल्याण व शिक्षण समितीत शिवआघाडीचे सदस्य नियुक्तीसाठी लागणारे जास्तीचे ताैलनिक संख्याबळ मिळाले. स्थायी समितीत १६ सदस्यांची नियुक्ती झाली आहे. 

त्यात शिंदेसेनेचे गजानन पाटील, महेश गायकवाड, जयवंत भोईर, विकास म्हात्रे, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, विजया पोटे आणि मनसेचे गणेश लांडगे, भाजपचे दीपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनीषा गायकवाड, मुकुंद पेंडणेकर, नंदू म्हात्रे, उपेक्षा भोईर, उद्धवसेनेचे विशाल गारवे यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील विकास प्रकल्पांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ४ हजार कोटी रुपये खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून आणल्याबद्दल महासभेत अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. 

विकास निधी चार हजार कोटी
विकास प्रकल्पांसाठी  ४ हजार ८०० कोटी मंजूर केल्याबद्दल खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सत्काराची सूचना शिंदेसेनेचे नगरसेवक नीलेश शिंदे यांनी केली. त्याला मंजुरी दिली. शिंदेसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे आणि उपमहापौर राहुल दामले यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. 

‘महिला बाल कल्याण’ मध्ये ११ सदस्य
महिला बाल कल्याण समितीमध्ये ११ सदस्यांची नियुक्ती झाली. त्यात शिंदेसेनेच्या रेखा म्हात्रे, ज्योती मराठे, अस्मिता मोरे, सारिका जाधव, मनसेच्या रसिका पाटील,  भाजपच्या मेघाली खेमा, पूजा गायकवाड, सराेज राय, सुनीता पाटील, रविना माळी,  उद्धवसेनेच्या तेजश्री गायकवाड यांचा समावेश आहे. शिक्षण समिती सदस्यपदी शिंदेसेनेचे प्रतीक पेणकर, अनघा देवळेकर, शालिनी वायले, दीपाली पाटील, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, भाजपचे अभिजीत थरवळ, जतीन प्रजापती, कविता म्हात्रे, श्यामल गायकर, रसिका पाटील,  उद्धवसेनेच्या अर्पण भाेईर यांचा समावेश झाला.

सभागृहनेतेपदी भाजपचे वरुण पाटील
महापालिकेच्या सभागृह नेते पदी भाजपचे वरुण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदाची मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MNS gets KDMC committee spots, supports Shinde's Shiv Sena alliance.

Web Summary : MNS representatives secured positions on KDMC committees, backing Shinde's Shiv Sena. Shiv Sena alliance gains majority. Development projects worth ₹4,000 crore approved.
टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना