कल्याणमध्ये कचऱ्याने भरलेल्या नाल्यात क्रिकेट खेळत मनसेने केली नालेसफाईची पोलखोल

By मुरलीधर भवार | Updated: May 7, 2026 20:58 IST2026-05-07T20:57:06+5:302026-05-07T20:58:51+5:30

हे अनोखे आंदोलन करीत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

mns exposes drain cleaning by playing cricket in a garbage filled drain in kalyan | कल्याणमध्ये कचऱ्याने भरलेल्या नाल्यात क्रिकेट खेळत मनसेने केली नालेसफाईची पोलखोल

कल्याणमध्ये कचऱ्याने भरलेल्या नाल्यात क्रिकेट खेळत मनसेने केली नालेसफाईची पोलखोल

मुरलीधर भवार, कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने नालेसफाईच्या कामाला सुरुवात केलेली नाही. कल्याण पश्चिेमेतील जरीमरीच्या नाल्यात कचरा साचला आहे. महापालिकेच्या निषेधार्थ मनसेने नाल्यात क्रिकेट खेळत महापालिकेच्या नालेसफाईच्या कामाचा पोलखोल केली आहे. मनसेचे विभागाध्यक्ष कपील पवार यांनी हे अनोखे आंदोलन करीत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

कल्याण पश्चिमेतील मल्हारनगर , गणेश नगर, जोशी बाग, जरीमरी तसेच झुंजारराव मार्केट येथून जाणारा मोठा नाल्यात पूर्णपणे कचरा साचला आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात येते. या नाल्यात जेसीबी, पोखलन लावून सफाई केली जातेनाल्यावरील अनाधिकृत बांधकामामुळे हे गेल्या दोन वर्षांपासून जेसीबी पोखलन लावून नाले सफाई शक्य होत नाही.

या नाल्यातील गाळ महापालिकेने नेमलेला कंंत्राटदार कशा पद्धतीने काढला जाईल ? कधी काढला जाईल ? असा प्रश्न आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी नालेसफाई केली जाते. नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. आज पाऊस सुरु होण्यापूर्वी शहरात वावटळ उठली होती. त्यानंतर ढगाळ वातावरण झाले होते. पावसाचे संकेत मिळाले आहे. पाऊस पडण्यापूर्वी नालेसफाई झाली नाही तर शहरात पूरसदृश्य परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे. मोठया नाल्यावर स्लॅब टाकून बंदिस्त केले तर ते साफ करण्यात अडचणी येतात. त्यामुळे मोठे नाले बंदिस्त करणयास मनसेने विरोध केला आहे. यासाठी मनसेच्या वतीने पवार यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना एक निवेदन दिले आहे.

Web Title : कल्याण में कचरे से भरी नाली में क्रिकेट खेलकर मनसे का प्रदर्शन

Web Summary : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका द्वारा नाला सफाई में देरी के खिलाफ मनसे ने कचरे से भरी नाली में क्रिकेट खेलकर विरोध प्रदर्शन किया। कपिल पवार ने मानसून से पहले रुकावटों के कारण बाढ़ के खतरे को उजागर किया। उन्होंने बड़े नालों को ढकने का भी विरोध किया।

Web Title : MNS Protests Kalyan Drain Neglect with Cricket in Garbage

Web Summary : MNS protested against Kalyan-Dombivli Municipal Corporation's delayed drain cleaning by playing cricket in a garbage-filled drain. Kapil Pawar led the unique protest, highlighting potential flooding risks due to uncleared blockages before the monsoon season. They also oppose covering major drains.