डोंबिवलीत कापड दुकानाला भीषण आग, मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 15:25 IST2021-04-17T15:23:17+5:302021-04-17T15:25:41+5:30
Massive fire at Dombivali Cloth Shop : महापालिकेचे कर्मचारी अरुण जगताप यांनी सतर्कता बाळगत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला माहिती दिली.

डोंबिवलीत कापड दुकानाला भीषण आग, मोठं नुकसान
डोंबिवली - पूर्वेकडील मानपाडा रस्त्यावरील शिवसेना मध्यवर्ती शाखेनजीक असलेल्या एका रेडिमेड शर्ट पँट कापडाच्या दुकानाला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी१ वाजण्याच्या सुमारास घडली, त्या आगीत दुकानाचा।पूर्ण माल जळून खाक झाला, आगीचे लोण भयानक होते, त्यामुळे परिसरातील अन्य काही दुकानांना त्याची झळ बसली आणि त्यांचेही खूप नुकसान झाले.
घटनेनंतर महापालिकेचे कर्मचारी अरुण जगताप यांनी सतर्कता बाळगत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळातच बंब तेथे आले त्यांनी आग विझवली, परंतु तोपर्यंत दुकान आगीत भस्मसात झाले होते. नेमकी आग कशामुळे लागली याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.