शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीची फिल्डिंग; दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी नेतेमंडळींची बैठक

By हरी मोकाशे | Updated: March 12, 2026 22:59 IST

Latur News:सत्ता स्थापनेवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये, याची दक्षता घेत महायुतीच्या नेतेमंडळींनी भाजप-राष्ट्रवादीच्या (अजित पवार) जिल्हा परिषद सदस्यांना मुंबईवारी घडवली आहे.

- हरी मोकाशे 
लातूर - सत्ता स्थापनेवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये, याची दक्षता घेत महायुतीच्या नेतेमंडळींनी भाजप-राष्ट्रवादीच्या (अजित पवार) जिल्हा परिषद सदस्यांना मुंबईवारी घडवली आहे. गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या मुंबईतील पन्हाळगड निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची अर्धा तास बैठक होऊन सत्ता स्थापनेचा निर्धार करण्यात आला.

मिनी मंत्रालय असलेली जिल्हा परिषद निवडणूक भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेने महायुती करून लढवली. त्यात भाजप १८, राष्ट्रवादी (अजित पवार) १२, शिंदेसेना १ अशा एकूण ३१ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. येत्या सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीच्या नेतेमंडळींनी आपल्या सदस्यांना मुंबईवारी घडवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी सकाळी हे सदस्य मुंबईत दाखल झाले.

पन्हाळगड निवासस्थानी महत्त्वाची बैठक...
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मुंबईतील पन्हाळगड निवासस्थानी आयोजित बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील-मुरुमकर, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आ. अभिमन्यू पवार, अरविंद पाटील-निलंगेकर यांची उपस्थिती होती.

सत्ता स्थापनेवर खलबते...
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची १६ मार्चला निवड होणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांनी एकत्रितपणे राहून महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा ३२ सदस्यांनी निर्धार केला. राष्ट्रवादीचे गटनेते प्रा. दिलीपकुमार मटके यांनी प्रास्ताविक केले. भाजपचे गटनेते रामचंद्र तिरुके यांनी आभार मानले.

सुरुवातीला पुणे, नंतर मुंबई...
फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून महायुतीतील जिल्हा परिषद सदस्यांना प्रारंभी लातूर, त्यानंतर पुणे येथे बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. सदस्य लातूरनंतर पुण्यात पोहोचल्यावर मुंबईला नेण्यात आले.

सोमवारी सकाळी होणार आगमन...
महायुतीतील सर्व सदस्य १५ मार्चपर्यंत मुंबईत मुक्कामी असणार आहेत. रविवारी रात्री निघून सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेत दाखल होणार आहेत. महायुतीच्या सदस्यांसोबत एक अपक्ष सदस्यही आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा पेच कायम...
अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ बैठक होऊन विचारविनिमय करण्यात आला. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासंदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्याचे पालन करण्यात येणार असल्याचे महायुतीतील काही सदस्यांनी सांगितले.

पहिल्यांदाच पाहिले विधानभवन...
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी जिल्हा परिषद सदस्यांनी विधानभवन परिसराला भेट देऊन पाहणी केली. तेव्हा आपण पहिल्यांदाच विधानभवन परिसरात आल्याचे काही सदस्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : MahaYuti secures council seats; members visit Mumbai to prevent upsets.

Web Summary : To secure power, MahaYuti leaders moved council members to Mumbai. A meeting was held at Minister Shinde's residence, solidifying their resolve for upcoming elections. Members were shown the Vidhan Bhavan for the first time.
टॅग्स :laturलातूरMahayutiमहायुतीBJPभाजपा