शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 08:44 IST

Mahesh Patil Allegations: कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक महेश पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करताच शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

डोंबिवली: शिंदेसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील, त्यांची बहीण माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, संजय विचारे यांनी मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. शिवसेनेचे पाच वेळा नगरसेवक राहिलेले वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे यांनीही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदेसेनेला जोरदार हादरा दिला.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या महेश पाटील यांनी शिंदेसेनेवर गंभीर आरोप केले. माजी नगरसेवक ‘मोक्का’चा आरोपी कुणाल पाटील यांना क्लीन चीट दिली. तसेच मला आणि माझा मुलगा साईश पाटील याला मारण्याचा कट त्यांचे काका वडार पाटील यांनी रचला होता. अशा आरोपींना अटक करू नका, असा दबाव शिंदेसेनेतील नेते टाकत होते. त्यामुळे मी गेले दोन दिवस प्रचंड दडपणाखाली होतो, अखेर त्या पक्षात राहणे मला जमले नाही, असे पाटील म्हणाले. भाजपचे माजी नगरसेवक राहुल दामले, नंदू म्हात्रे, हृदयनाथ भोईर, दीपेश म्हात्रे, मंदार हळबे, जिल्हाध्यक्ष नंदू परब, शशिकांत कांबळे उपस्थित होते.

वामन म्हात्रेंच्या मुलाचाही भाजपत दणक्यात प्रवेश

दिवंगत शिंदेसेना नगरसेवक वामन म्हात्रेंचा मुलगा अनमोल म्हात्रे यांनीही कुटुंबीयांसमवेत चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. म्हात्रे कुटुंबीय कट्टर शिवसैनिक असल्याची सर्वत्र ख्याती होती, परंतु आता घरामध्ये आगामी निवडणूक उमेदवारीवरून दुफळी झाल्याने अनमोल यांनी स्वतंत्र निर्णय घेत भाजपसमवेत जाण्याचा निर्णय घेतला. जे गेले आहेत, त्यांना आणि मित्र पक्षाला खूप-खूप शुभेच्छा. कोणाच्या जाण्याने शिंदेसेनेला काही फरक पडत नाही, असे या प्रवेशानंतर घेतलेल्या पत्र परिषदेत आ. राजेश मोरे यांनी म्हटले. विश्वनाथ राणे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kalyan-Dombivli Politics: Leader alleges plot to kill him, son after joining BJP.

Web Summary : Mahesh Patil, after joining BJP, accuses Shinde Sena of protecting criminals. He alleges a murder plot against him and his son, claiming pressure from Shinde Sena leaders prevented arrests. Anmol Mhatre, son of the late Vaman Mhatre, also joined BJP.
टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना