शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई २१ लाखांचा १०७ किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 19:24 IST

३ तस्करांना सापळा रचत पोलिसांनी ठाेकल्या बेड्या, तिघेही सराईत गुन्हेगार

कल्याण: कल्याणअमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २१ लाख ४० हजार रुपये किमतीचा १०७ किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी ३ तस्करांना अटक केली आहे. वसीम खान उर्फ पिला, दिनेश कुमार आणि मोहित वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या पथकाने मोठ्या शीताफिने या तिघांनाही अटक केली.

हे तिघेही सराईत गुन्हेगार असून यांच्यावर यापूर्वीही अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा गांजा कुठून आणला ? कोणाला विकला जाणार होता ? या मागील मुख्य सूत्रधार कोण आहे ? याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.

खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची खरेदी-विक्री होणार असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड आणि उपनिरीक्षक जितेंद्र ठोके यांच्या पथकाने वाडेघर परिसरातील वाडेकर डम्पिंग ग्राउंडजवळ सापळा रचला. तेथे संशयास्पद हालचाल करणारे ३ जण आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. त्यांच्या जवळ हिरव्या-पांढऱ्या रंगाच्या गोण्या आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. चौकशीत आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत धाडसी कारवाई केली. तिघांनाही ताब्यात घेतले. तपासात त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kalyan Anti-Narcotics Squad Seizes ₹2.1 Million Worth of Ganja

Web Summary : Kalyan police seized 107 kg of ganja worth ₹2.1 million, arresting three smugglers: Wasim Khan, Dinesh Kumar, and Mohit Verma. The suspects attempted to flee but were apprehended. Police suspect a larger drug trafficking racket and are investigating the source and destination of the seized drugs.
टॅग्स :Drugsअमली पदार्थkalyanकल्याण