शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यादेखत ‘त्या’ पत्रकाराने पाहिले आपल्या दोन भावांचे मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 00:27 IST

कोरोनामुळे मृत्यू : कानाडे कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर

कल्याण : शहरातील स्थानिक पत्रकार जितेंद्र कानाडे यांच्या दोन भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आपल्या डोळ्यादेखत अचानक दोन भाऊ गेल्याने जितेंद्र तसेच त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

जितेंद्र यांना पाच भाऊ. त्यापैकी महेंद्र कानाडे (रा. आधारवाडी) हेही एक लहान वर्तमानपत्र चालवून त्यांचा उदरनिर्वाह करीत होते. पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार. पत्नी गृहिणी, तर एका मुलीचे लग्न झाले आहे. एक मुलगी वकिलीचे शिक्षण घेत आहे. कोरोनाची लागण झाल्याने महेंद्र यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने जितेंद्र यांनी त्यांना आर्ट गॅलरीतील कोविड रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यातून त्यांचे कुटुंब सावरत असतानाच, जितेंद्र यांचा दुसरा भाऊ सुनील यालाही कोरोनाची लागण झाली. त्याच्यावरही आर्ट गॅलरी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी सुनील यांचा टुडी-एको काढण्यास सांगितले. त्यासाठी जितेंद्र यांनी अडीच हजार रुपये भरले. सुनील यांची ऑक्सिजन पातळी सोमवारपर्यंत चांगली होती. परंतु, अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. सुनील हे सुरक्षारक्षकाचे म्हणून काम करत होते. त्यांना दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. १५ हजारांच्या पगारात ते कुटुंबाचा खर्च चालवित होते. 

खासगी रुग्णवाहिकाचालकांकडून लूटमहेंद्र यांना पलावा येथील रुबी रुग्णालयातून कल्याणला हलवताना खासगी रुग्णवाहिकाचालकाने २५ हजारांची मागणी केली होती. त्यामुळे रुग्णांची अशाप्रकारे लूट होत असल्याचा आरोप जितेंद्र यांनी केला आहे.

आटॅ गॅलरीत उपचारादरम्यान अरुणा पाटील यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालकाने आटॅ गॅलरी ते बैलबाजार स्मशानभूमीपर्यंत साडेतीन हजार भाडे मागितले. हे भाडे अरुणा यांच्या जावयाने दिल्याने मृतदेह स्मशानभूमीत नेला. 

यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, रुग्णवाहिकाचालकांकडून जास्त पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे. आरटीओंच्या माध्यमातून चौकशी करून रुग्णवाहिका चालकांविरोधात कारवाई केली जाईल.

केडीएमसीकडे १५ रुग्णवाहिका आहेत; तर कोविडकाळासाठी ३४ रुग्णवाहिका भाड्याने घेतल्या आहेत. मग या रुग्णवाहिका रुग्णांना का उपलब्ध होत नाहीत, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याण