शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

Green Water in Dombivali: आश्चर्यचकित व्हाल! चोहोबाजुला पावसाचे गढुळ पाणी तुंबले; पण डोंबिवलीत नाल्यातून हिरवे पाणी वाहू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 20:00 IST

Green Water in Dombivali: 24 तासाच्या आत उत्पादन प्रक्रिया  थांबविण्याची "त्या" कंपनीला प्रदूषण मंडळाची नोटीस 

- मयुरी चव्हाण

लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याण : डोंबिवली  एमआयडीसी मधील गांधीनगर परिसरातुन चक्क हिरव्या रंगाचा नाला  तुडूंब भरून वाहत होता. याबाबतचा व्ह्डिओ येथील नागरिकांनी  सोशल मीडियावर शेयर केल्यानं एकच खळबळ उडाली. मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फायदा घेत कंपनीने  केमिकलयुक्त पाणी नाल्यात सोडल्याचा महाप्रताप केला अन पाण्याचा रंग हिरवा (Green Water flowing) झाला होता. या प्रकरणाची गंभीर  दखल घेत केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि  एमआयडीसी प्रशासनाला संबंधित  कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रदूषण मंडळाने कंपनीला 24 तासाच्या आत उत्पादन प्रक्रिया थांबवण्याची नोटीस जारी केली आहे. या वृत्ताला आयुक्त सूर्यवंशी आणि मंडळाच्या अधिका-यांनीही लोकमतशी बोलताना दुजोरा दिला आहे. (Green Water in Dombivali Nala in Rain flood water.)

 रायबो फार्म या कंपनीने केमिकलयुक्त पाणी  थेट नाल्यात सोडल्याने नाल्यातून हिरव्या रंगाचे पाणी वाहू लागले होते. ही  कंपनी फूड कलर तयार करण्याचे काम करते अशी माहिती समोर आली आहे.  कंपनीच्या ज्या काही त्रुटी आहेत त्याची पुन्हा चौकशी केली जाणार असून  त्यानंतर अंतिम निर्णय  घेण्यात येईल अशी माहिती प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी सांगितले.

तसेच  या कंपनीचा   वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा खंडित करण्याबाबत संबंधित विभागाला  सूचना देखील  देण्यात आल्या आहेत.  तसेच 24 तासाच्या कंपनीने त्यांचं उत्पादन थांबवावे अशी  नोटीस देखील जारी करण्यात आल्याचे  वाघमारे यांनी स्पष्ट केले.  त्यामुळे 24 तासाच्या आत कंपनी  उत्पादन प्रक्रिया बंद करते का? तसेच येणाऱ्या काळात प्रदूषण नियंत्रण मंडळ या  कंपनीच्या बाबतीत कोणता अंतिम निर्णय  घेते ते पाहावे लागेल.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीpollutionप्रदूषणMIDCएमआयडीसी