मास्क परिधान न  करणा-यांकडून  सुमारे 4 लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 16:40 IST2021-03-25T16:40:23+5:302021-03-25T16:40:43+5:30

काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे दिसून येत आहे

A fine of around Rs 4 lakh was levied on those who did not wear masks | मास्क परिधान न  करणा-यांकडून  सुमारे 4 लाखाचा दंड वसूल

मास्क परिधान न  करणा-यांकडून  सुमारे 4 लाखाचा दंड वसूल

कल्याण : कोरोनाची साखळी  तोडण्याच्या उद्देशाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने  कठोर  पाऊले उचलण्यास सुरवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मास्क परिधान न करता वावरणाऱ्या नागरिकांवर पालिका कारवाई करत असून गेळ्या दहा दिवसांत पालिकेने सुमारे 4 लाख दंड वसूल केला आहे.

काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे दिसून येत आहे. घराबाहेर फिरतांना विना मास्क वा कापड परिधान न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध दंडाची कारवाई महापालिकेने जोमाने सुरू ठेवली आहे.

15 मार्च ते  24 मार्च या कालावधी दरम्यान मास्क न परिधान करणाऱ्या 791 व्यक्तींकडून  3 लाख 95 हजार 400  रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी अथवा गर्दीच्या ठिकाणी वावरतांना मास्क परिधान करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात  आले आहे.

Web Title: A fine of around Rs 4 lakh was levied on those who did not wear masks