शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता घेऊनही पालिकेने मराठी तरुणीचा स्टॉल उचलला, थेट राज ठाकरेंनी घेतली दखल; अविनाश जाधवांना पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:33 IST

डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात शोरमा विक्री करणाऱ्या एकता सावंत या तरुणीने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर करुन आपली व्यथा मांडली होती.

शोरमा विक्री करणाऱ्या एका मराठी तरुणीवर अन्याय होत असल्याचा आरोप करत तिच्या व्हिडिओने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले असून, या प्रकरणाची थेट दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. परप्रांतीय फेरीवाल्यांना टपऱ्या लावण्याची मुभा दिली जाते, मात्र मराठी असल्यामुळे आपल्यालाच वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरात शोरमा विक्री करणाऱ्या एकता सावंत या तरुणीने इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर करुन आपली व्यथा मांडली होती. गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाच्या फेरीवाला कारवाई पथकाकडून केवळ आपल्यावरच कारवाई केली जात असल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या शेजारील इतर परप्रांतीय फेरीवाल्यांच्या टपऱ्यांवर मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याचे तिचे सांगितले.

'टॅरिफ'बाबत लवकरच मिळणार आनंदाची बातमी! अमेरिका भारतावरील २५% कर काढून टाकणार, ट्रम्प यांच्या मंत्र्याचा दावा

राज ठाकरेंनी दखल घेतली

दरम्यान, तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी तात्काळ दखल घेत मनसे नेते अविनाश जाधव यांना डोंबिवलीत पाठवले. अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह डोंबिवलीत येऊन एकता सावंत यांची भेट घेतली. स्टेशन परिसरात जवळपास तासभर चर्चा करत त्यांनी तिला निर्भयपणे आपला व्यवसाय सुरू ठेवण्यास सांगितले.

यावेळी अविनाश जाधव यांनी एकता सावंत यांना, या प्रकरणात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांशी राज ठाकरे स्वतः चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले. मराठी तरुणीवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेकडून मांडण्यात आली.

या घटनेमुळे पुन्हा एकदा डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाला कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, परप्रांतीय फेरीवाले बिनधास्तपणे टपऱ्या लावत असताना मराठी तरुणीला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप चर्चेचा विषय ठरत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Despite bribe, Marathi girl's stall removed; Raj Thackeray intervenes.

Web Summary : MNS chief Raj Thackeray intervened after a Marathi girl's Shawarma stall was unfairly removed by the Kalyan-Dombivli Municipal Corporation, despite alleged bribe payments. MNS leader Avinash Jadhav visited her, assuring support and raising concerns about discrimination against local vendors.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेmarathiमराठीkalyanकल्याण