शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : रोगापेक्षा इलाज भयंकर! लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरूच, नागरिकांनी व्यक्त केला संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 18:52 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : लसीकरण करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती कल्याण-डोंबिवलीकरांची झाली असल्याचे सांगत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. 

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ  वारंवार समोर येत आहे. टप्प्याटप्प्याने लस प्राप्त होत असल्याने लसीकरण केंद्रही बंद ठेवावी लागत आहे. अशातच लसीकरण केंद्र आणि केडीएमसी प्रशासन यांच्यात देखील योग्य समन्वय नसल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कल्याणातील गुरूनानक लसीकरण केंद्रावरही गुरुवारी सकाळी अचानक नागरिकांना लस प्राप्त न झाल्याचे सांगत पुन्हा जाण्यास सांगितले. यामुळे पहाटेपासून लसीकरणासाठी उभ्या असलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला. आता लसीकरण करणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती कल्याण डोंबिवलीकरांची झाली असल्याचे सांगत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. 

गुरुवारी कल्याणातील गुरुनानक हायस्कूल लसीकरण केंद्रावर कुपन घेण्यासाठी पहाटे 3 वाजल्यापासून जवळपास 300 नागरिक उभे होते. मात्र सकळी साडेसात वाजता अचानक लस उपलब्ध झाली नसल्याने लसीकरण होणार नाही असे सांगण्यात आले. या गलथान कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लसीकरण होणार नाही याची महिती  आदल्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी देणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया केंद्रावर उपस्थित असलेल्या संबंधीतांसमोर व्यक्त केल्या. यावर आम्हाला महापालिका प्रशासनाने  सकाळी लस संपल्याची माहिती दिली असे सांगण्यात आले. या सर्व प्रकारामुळे  केडीएमसी प्रशासन आणि लसीकरण केंद्र नागरिकांसोबत उंदीर - मांजराचा खेळ खेळत आहेत का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  

लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वात जास्त फटका बसला. केडीएमसीचे आरोग्य विभागाचे आर. सी. एच. ऑफीसर डॉ. संदीप निंबाळकर यांना विचारले असता लशींचा साठा अनेकदा रात्री उशीरा किंवा सकाळी प्राप्त होतो. लसीकरणाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे वेळोवेळी दिली जाते व तसे बोर्ड देखील केंद्राबाहेर लावले जातात असे सांगत प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. 

लसीकरण करणे हे महत्वाचे झाले आहे. लसींचा साठा कमी असल्याने अडचणी येत आहे हे मान्य आहे. मात्र लसीकरण केंद्र व पालिका प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय असणे गरजेचे आहे. कारण अनेक नागरिक सुट्टी घेऊन लसीकरण करत आहे. लस घेण्यासाठी आता खूप मनस्ताप सहन करावा लागत असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

-  प्रतीक्षा वाराणकर, नागरिक 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या