शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा

By मुरलीधर भवार | Updated: January 13, 2026 06:51 IST

भाजपा उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांना गंभीर दुखापत

डोंबिवली :कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदे सेना युतीमध्ये निवडणूक लढत आहे. मात्र  डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २९ मध्ये युती नाही. कारण या पॅनलमध्ये भाजपच्या चार उमेदवारांसमोर शिंदे सेनेचे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले  आहेत. रविवारी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करीत असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या उमेदवाराने केला होता. 

भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा आरोप देखील केला आला. या कारणावरून जोरदार राडा झाला. त्यानंतर सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व येथील तुकारामनगरमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले. भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटप करीत असल्याचे आरोप करत शिंदे सेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या दरम्यान जोरदार  राडा झाला. भाजपा उमेदवार पप्पू म्हात्रे आणि भाजपा उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओम नाथ नाटेकर  जखमी झाले आहेत. इतकेच नाही तर शिंदे सेनेचे उमेदवार रवी पाटील देखील जखमी झाले असल्याची माहिती आहे.

ओमनाथ नाटेकर यांना डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र शिंदे सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीला हिंसक वळण लागले आहे.

२९ अ मधून भाजपच्या कविता म्हात्रे यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या रुपाली म्हात्रे, ब मधून भाजपच्या आर्या नाटेकर यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या रंजना पाटील, क मधून भाजपचे मंदार टावरे यांच्या विरोेधात शिंदे सेनेचे नितीन पाटील हे उमेदवार आहे. ड मधून भाजपच्या अलका म्हात्रे यांच्या विराेधात शिंदे सेनेचे रवी पाटील उभे ठाकले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Violence erupts in Dombivli election; BJP candidate's husband injured.

Web Summary : Clash broke out between BJP and Shinde Sena workers in Dombivli over alleged money distribution. BJP candidate's husband was seriously injured. Police investigating.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपा