शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

आता बैलाचा Birthday! कल्याणमध्ये कोरोनाकाळात धुमधडाका सुरुच; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 13:10 IST

Bull's Birthday celebration: डोंबिवलीच्या मोठागावमध्ये रेतीबंदर रोडला राहणाऱ्या किरण म्हात्रे याने त्याच्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. यासाठी स्टेज बांधून मित्रमंडळींना मोठ्या संख्येने बोलावले होते. बैलाचा वाढदिवस साजरा करताना या लोकांनी स्टेजवर डान्सदेखील केला.

राज्यात कोरोनाचा आकडा 13 हजार पार झाला आहे. तरीदेखील लोक गांभीर्याने घेत नाहीएत. कल्याणमध्ये जत्रेसारखा लग्नसोहळा केल्याने गुरुवारीच गुन्हा दाखल झालेला असताना आता चक्क बैलाचा वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार घडला आहे. (Bull's Birthday celebration in Dombivli.)

डोंबिवलीच्या मोठागावमध्ये रेतीबंदर रोडला राहणाऱ्या किरण म्हात्रे याने त्याच्या बैलाचा वाढदिवस साजरा केला. यासाठी स्टेज बांधून मित्रमंडळींना मोठ्या संख्येने बोलावले होते. बैलाचा वाढदिवस साजरा करताना या लोकांनी स्टेजवर डान्सदेखील केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर साथरोग प्रतिबंध अधिनियमानुसार  गुन्हा दाखल केला आहे. 

हा प्रकार 11 मार्चला घडला आहे. किरण एकनाथ म्हात्रे हा तरुण डोबिवली पश्चिम भागात राहतो. त्याने गोवर्धन टॉवरच्या समोरील त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे हा बर्थडे सेलिब्रेट केला. लोकांना जमवून तोंडाला मास्क न लावता निष्काळजीपणे स्वतःचा व इतरांचा जीव माहिती असूनही धोक्यात घातला, तसेच बैलाचा वाढदिवस साजरा केला असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

लग्नसोहळ्यास 700 जणांची गर्दी

कल्याण पूर्वेतील 60 फुटी रोड, गॅस कंपनी शेजारी एका लग्न समारंभाला मोठ्या प्रमाणावर लोक आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार 5/ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांच्या पथकाने पाहणी केली असता या लग्न सोहळ्याला सुमारे 700 हून अधिक लोक हजर असल्याचे दिसले. एवढ्या लोकांसोबत लग्न सोहळ्याला परवानगी नसताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आहे. यामुळे पोलिसांनी या विवाह सोहळ्याचे आयोजक राजेश यशवंत म्हात्रे, चिंचपाडा, कल्याण पूर्व, महेश कृष्णा राऊत, कासारवडवली, जि. ठाणे यांचे विरुद्ध भा.द.वि. कलम 188, 269, 270, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम51 ,  तसेच कोविड-19  उपाययोजना नियम 11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस