शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

बिल्डरने भरले पाच कोटी ४७ लाख रुपये; अभय योजनेचा फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 12:46 AM

थकीत ओपन लॅण्डच्या करापोटी वाचले चार कोटी

कल्याण : केडीएमसीने मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ घेत बिल्डर जोहर झोझवाला यांनी पाच कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा महापालिकेत केला आहे. मनपाला त्यांच्याकडून थकबाकीपोटी नऊ कोटी ७० लाख रुपये येणे होते. मात्र, त्यांनी अभय योजनेचा फायदा घेतल्याने त्यांचे चार कोटी २३ लाख रुपये वाचले आहेत.

झोझवाला यांनी पाच कोटी ४७ लाखांचा धनादेश केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मालमत्ताकर वसुली विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी उपस्थित होते.  बारावे य़ेथील गोदरेज पार्क येथील ओपन लॅण्डवर झोझवाला यांना बांधकाम प्रारंभपत्र देण्यात आले आहे. त्यांच्याकडून २०१४ पासून थकीत रक्कम महापालिकेस येणे बाकी होती. मात्र, त्यांनी अभय योजनेचा फायदा घेतला आहे. या योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असून, त्याचा लाभ अन्य मालमत्ता थकबाकीदारांनीही घ्यावा, असे आवाहन केडीएमसी आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

१०० कोटींची थकबाकीओपन लॅण्ड कराच्या थकबाकीपोटी किमान १०० कोटींची थकबाकी आहे. महापालिकेच्या मालमत्तावसुली पथकाने १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरदरम्यान ३४ कोटी १९ लाख रुपये वसूल केले होते. त्यानंतर चार दिवसांत १० कोटी ५८ लाख रुपये वसूल केले. आता झोझवाला यांनी पाच कोटी ४७ लाख रुपये भरले आहे. त्यामुळे एकाच दिवसात इतक्या मोठ्या रकमेची वसुली झाली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका