शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला डाेंबिवलीत भररस्त्यात नेसवली साडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 06:06 IST

आक्षेपार्ह पोस्टनंतर प्रकार; राजकीय वातावरण तापले

डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश ऊर्फ मामा पगारे यांना भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी, दत्ता माळेकर आदींनी भररस्त्यात साडी नेसवल्याची घटना मंगळवारी डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावर घडली. त्या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. 

कट्टर काँग्रेस नेते अशी ओळख असलेले पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत, हात पकडून त्यांना साडी नेसवून त्यांचा जाहीर निषेध केला. त्यावेळी जातिवाचक शिवीगाळ केल्याचे पगारे यांचे म्हणणे आहे.

पंतप्रधानांची बदनामी करायची तुमची लायकी आहे का, असे भाजप कार्यकर्ते पगारे यांना सुनावत असल्याचे व पुन्हा असे करण्याची हिंमत कराल का, असा इशारा देत असल्याचे व्हिडीओत दिसते.  भाजपचे नंदू परब यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात पगारे यांनी फॉरवर्ड केलेल्या पोस्टसंदर्भात निवेदन दिले होते. काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी पगारे यांच्यासोबत जे कृत्य करण्यात आले, त्याचा निषेध केला.

आठ-दहाजण जणांनी शिवीगाळ करून साडी नेसवली. व्हिडीओ चित्रित करून व्हायरल केला. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. - मामा पगारे, काँग्रेस पदाधिकारी

पगारेंचा बीपी वाढलाभाजप पदाधिकाऱ्यांविरोधात कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ कल्याण येथे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या कार्यालयात गेले होते. तेथे चर्चा करताना मामा पगारे यांचा रक्तदाब वाढला. त्यानंतर ते बेशुद्ध झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात आले.

मामा पगारे यांनी पंतप्रधानांचा आक्षेपार्ह फोटो ज्या प्रकारे फोटो व्हायरल केला, त्याच प्रकारे त्यांचा आम्ही सत्कार केला.  - नंदू परब, जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस