बेजबाबदार व्यक्तीने हाताळली श्री मलंगगड फ्युनिक्युलर रोपवे; प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू

By पंकज पाटील | Updated: February 25, 2026 23:34 IST2026-02-25T23:33:44+5:302026-02-25T23:34:46+5:30

सामाजिक कार्यकर्ते मंगेश भोईर यांनी प्रकार उघडकीस आणला

An irresponsible person manipulated the Sri Malanggad Funicular Ropeway; Playing with the lives of passengers | बेजबाबदार व्यक्तीने हाताळली श्री मलंगगड फ्युनिक्युलर रोपवे; प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू

बेजबाबदार व्यक्तीने हाताळली श्री मलंगगड फ्युनिक्युलर रोपवे; प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू

पंकज पाटील, अंबरनाथ: श्री मलंगगड येथील फ्युनिकुलर रोपवे एका बेजबाबदार व्यक्तीने हाताळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने रोपवेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २३ फेब्रुवारीला रात्री हा प्रकार घडला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मंगेश भोईर यांनी हा प्रकार समोर आणला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

मंगेश भोईर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, विनोद पाटील (रा. मलंगगड) हा संबंधित रोपवे प्रकल्पात अधिकृत तंत्रज्ञ, ऑपरेटर किंवा कर्मचारी नसताना त्याने बेकायदेशीररित्या फ्युनिकुलर रोपवेच्या ऑपरेटिंग सिस्टीमचा ताबा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे त्यावेळी रोपवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा व्हिडिओ संबंधित व्यक्तीने स्वतःच्या इन्स्टाग्राम खात्यावर सार्वजनिकरित्या अपलोड केल्याचेही भोईर यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे रोपवे प्रकल्पाच्या सुरक्षाव्यवस्थेवर तसेच देखरेखीच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, श्री मलंगगड यात्रेपूर्वी महाराष्ट्रातील सर्वात लांब फ्युनिकुलर सेवेचे लोकार्पण करण्यात आले होते. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असल्याने रोपवे सेवा महत्त्वाची मानली जात आहे. मात्र या रोपवेचा ताबा खाजगी व्यक्ती घेऊन तेथे रिल्स बनवत असल्यामुळे ही रोपवे सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे.

संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच रोपवे प्रकल्पाच्या सुरक्षेची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

Web Title : लापरवाह व्यक्ति ने मलंगगड फ्यूनिकुलर रोपवे को संभाला, यात्रियों का जीवन खतरे में

Web Summary : एक अनाधिकृत व्यक्ति द्वारा मलंगगड फ्यूनिकुलर रोपवे चलाने का आरोप है, जिससे सुरक्षा चिंताएँ बढ़ गई हैं। यात्रियों के लिए संभावित खतरे का हवाला देते हुए शिकायत दर्ज की गई है, और तीर्थयात्रियों के लिए हाल ही में शुरू की गई सेवा को देखते हुए सुरक्षा उल्लंघन की जाँच की मांग की गई है।

Web Title : Malanggad Funicular Ropeway Handled Irresponsibly, Passengers' Lives Endangered

Web Summary : An unauthorized individual allegedly operated the Malanggad funicular ropeway, raising safety concerns. A complaint has been filed, citing potential danger to passengers and demanding investigation into the security breach, especially given the recent launch of the service for pilgrims.