राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार बुधवारपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 09:27 PM2018-10-25T21:27:45+5:302018-10-25T21:28:23+5:30

६६ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा" दि. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१८ या कालावधी मध्ये आडवा फाटा मैदान सिन्नर, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.

State Championship championship kabaddi competition from Wednesday | राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार बुधवारपासून

राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार बुधवारपासून

मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंच, सिन्नर यांच्या सौजन्याने "६६ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा" दि. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१८ या कालावधी मध्ये आडवा फाटा मैदान सिन्नर, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शितलताई सांगळे व सह्याद्री युवा मंच, सिन्नर या संस्थाने ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यास्पर्धेत राज्यातून पुरुषाचे २५ संघ तर महिलांचे २० संघ सहभागी होणार आहेत. जवळपास ५४० पुरुष व महिला खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच राज्यभरातून ७० पंच स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. स्पर्धेसाठी मातीची सहा मैदाने असणार आहेत. राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतून निवडला जाणारा पुरुष व महिला संघ ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करेल.

Web Title: State Championship championship kabaddi competition from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.