बाबो! चोरून चोरून वाचत होती पतीच्या फोनमधील मेसेज, पत्नीला तुरूंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 06:26 PM2021-07-30T18:26:56+5:302021-07-30T18:28:41+5:30

तुम्हीही पतीचे मोबाइल मेसेज चेक करत असाल तर सावध व्हा. यूएईमध्ये याच कारणाने एका पत्नीला शिक्षा झाली आहे. 

Women use to read husband massage secretly got jailed in UAE | बाबो! चोरून चोरून वाचत होती पतीच्या फोनमधील मेसेज, पत्नीला तुरूंगवासाची शिक्षा

बाबो! चोरून चोरून वाचत होती पतीच्या फोनमधील मेसेज, पत्नीला तुरूंगवासाची शिक्षा

Next

(प्रातिनिधिक छायाचित्र)

जगभरात रोज वेगवेगळे गुन्हे होत असतात. या गुन्ह्यासाठी गुन्हेगारांना वेगवेगळ्या शिक्षाही होत असतात. पण कधी तुम्ही एका पत्नीला पतीच्या मोबाइलमधील मेसेज वाचण्यावरून शिक्षा झाल्याचे ऐकले का? नाही ना! मात्र अशी एक घटना समोर आली आहे. तुम्हीही पतीचे मोबाइल मेसेज चेक करत असाल तर सावध व्हा. यूएईमध्ये याच कारणाने एका पत्नीला शिक्षा झाली आहे. 

'इंडिया टाइम्स'च्या एका रिपोर्टनुसार, Ras AI Khaimah च्या सिव्हिल कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. महिला तिच्या पतीचा मोबाइलच चेक करते, त्याचे मेसेज वाचते याबाबत महिला दोषी आढळून आली आहे. इतकंच नाही तर ती त्याच्या पहिल्या पत्नीतील आणि तिच्यातील बातचीत तिच्या मुलीसोबत शेअर करत होती. (हे पण वाचा : OMG! नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या पोटात वाढत होते जुळे बाळ, असा झाला खुलासा)

महिलेला पतीची प्रायव्हसी भंग केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आला आहे. तिला यासाठी ८,१०० AED (१.६४) लाख रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम नुकसान भरपाई म्हणून पतीला देण्यात आली आहे.  

दुसऱ्या पत्नीकडून पतीचे ई-मेल आणि इतर खाजगी माहिती पाहिल्याच्या कारणावरून त्याचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. कोर्टात पतीने आपल्या दुसऱ्या पत्नीकडून यासाठी आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्याने यासाठी २५,००० AED (५ लाख रूपये) मागितले होते. पण कोर्टाने ही मागणी मान्य केली नाही. आणि महिलेला एक महिन्यासाठी तरूंगात पाठवलं आणि तिला दंडही ठोठावला. 
 

Web Title: Women use to read husband massage secretly got jailed in UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.