OMG! नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या पोटात वाढत होते जुळे बाळ, असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 12:13 PM2021-07-30T12:13:50+5:302021-07-30T12:14:25+5:30

'द सन'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, नवजात मुलीचा जन्म याच महिन्यात इस्त्राइलच्या अशदोदच्या अस्सुता मेडिकल सेंटरमध्ये झाला होता.

OMG! Twin growing in baby girls stomach in Israel doctors shocked | OMG! नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या पोटात वाढत होते जुळे बाळ, असा झाला खुलासा

OMG! नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या पोटात वाढत होते जुळे बाळ, असा झाला खुलासा

Next

इस्त्राइलच्या (Israel) अशदोदमध्ये एक नुकतीच जन्माला आलेली मुली प्रेग्नेंट (Infant Pregnant In Israel) असल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. काही या घटनेला चमत्कार म्हणत आहेत तर काही लोक याला दुर्मीळ घटना म्हणत आहेत. एक्सपर्ट म्हणाले की, ५ लाख बाळांमध्ये एखाद्या बाळासोबत असा प्रकार होण्याची शक्यता असते.

'द सन'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, नवजात मुलीचा जन्म याच महिन्यात इस्त्राइलच्या अशदोदच्या अस्सुता मेडिकल सेंटरमध्ये झाला होता. डॉक्टरांना आढळलं की, नवजात मुलीचं पोट इतर बाळांच्या तुलनेत मोठं होतं. यानंतर बाळाचं अल्ट्रासाउंड आणि एक्क-रे काढण्यात आला. ज्यानंतर समोर आलं की, मुलीच्या पोटात एक भ्रूण विकसित होत आहे. हे भ्रूण मुलीच्या पोटात गोल्या १० आठवड्यांपासून विकसित होत आहे. १० आठवड्यात या भ्रूणाचा मेंदू, हृदय, हात आणि पाय विकसित झाले होते.

Neonatology चे डायरेक्टर उमर ग्लोबस म्हणाले की, भ्रूण अजून पूर्णपणे विकसित झालेलं नव्हतं. नुकत्याच जन्माला आलेल्या मुलीच्या पोटात भ्रूण आढळल्याने सगळेच हैराण झाले आहेत. एक्सपर्टच्या एका टीमने ऑपरेशन करून नवजात मुलीच्या पोटातून  भ्रूण काढून टाकलं. आता तिला जीवाचा धोका नाही. ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना आढळलं की, नवजात मुलीच्या पोटात एक नाही तर दोन भ्रूण होते.

डॉक्टरांना संशय आहे की, मुलीच्या पोटात आणखी एक भ्रूण असू शकतं. डॉक्टर वेळोवेळी मुलीचं चेकअप करत आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, इस्त्राइलमध्ये याआधीही नवजात बाळाच्या पोटात भ्रूण आढळून आल्याच्या ७ घटना समोर आल्या आहेत. यातील एक बाळ १५ वर्षाचं झालं आहे. हे मुल पूर्णपणे निरोगी आहे.
 

Web Title: OMG! Twin growing in baby girls stomach in Israel doctors shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.