शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 19:25 IST

६२ वर्षीय महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याची मतदार म्हणून नोंदणी केली आणि त्याच्या नावाने दोनदा मतदान केलं.

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ६२ वर्षीय महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याची मतदार म्हणून नोंदणी केली आणि त्याच्या नावाने दोनदा मतदान केलं. महिलेवर आता अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लॉरा ली युरेक्स असं महिलेचं नाव असून माया जीन युरेक्स असं तिच्या कुत्र्याचं नाव आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर हे समोर आलं, ज्यामुळे अधिकारी हैराण झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना कॅलिफोर्नियाच्या दोन वेगवेगळ्या निवडणुकांशी संबंधित आहे. पहिली २०२१ ची गव्हर्नर रिकॉल निवडणूक होती आणि दुसरी वेळ २०२२ च्या प्राथमिक निवडणूक होती, जिथे कुत्र्याच्या नावाने मतदान करण्यात आलं होतं. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, पहिल्या निवडणुकीत मत स्वीकारलं गेलं होतं, परंतु दुसऱ्या निवडणुकीत बॅलेट रिजेक्ट झालं. तपासात असं दिसून आलं की, कुत्र्याचं नाव मतदान यादीत समाविष्ट होतं, परंतु सिस्टम ते ओळखण्यात अपयशी ठरली. अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, पाळीव प्राण्यांच्या नावाने मतदान करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ऑक्टोबर २०२४ मध्ये लॉरा लीने स्वतः ऑरेंज काउंटी रजिस्ट्रार ऑफ व्होटर्सना कळवलं की, तिने तिच्या कुत्र्याची मतदार म्हणून नोंदणी केली आहे तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं. तपासात असंही उघड झालं की, महिलेने स्वतः सोशल मीडियावर पुरावे पोस्ट केले होते. जानेवारी २०२२ मध्ये, तिने कुत्र्याचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये कुत्र्यावर "मी मतदान केलं" असा स्टिकर लावलेला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये एक पोस्ट शेअर केली.

ऑरेंज काउंटी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी ऑफिसने लॉरा ली युरेक्सविरुद्ध अनेक आरोपांखाली खटला दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे केवळ निवडणूक नियमांचं उल्लंघन नाही तर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याचा गंभीर गुन्हा देखील आहे. या घटनेत आणखी कोणी सामील आहे का हे तपास संस्था आता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना धक्का बसला आहे. लोक सोशल मीडियावर "डॉगी व्होट स्कँडल" म्हणून ते शेअर करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : California Woman Registers Dog to Vote, Faces Fraud Charges

Web Summary : A California woman, Laura Lee Yurex, is facing charges for registering her dog, Maya, as a voter and fraudulently casting ballots in its name in two elections. The investigation began after Yurex confessed, revealing social media posts as evidence.
टॅग्स :dogकुत्राAmericaअमेरिकाVotingमतदानElectionनिवडणूक 2024Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके