कारच्या काचेवरील ब्लॅक डॉट्स फक्त डिझाइन नाही, ते असण्यामागे आहे सुरक्षेसंबंधी मोठं कारण; जाणून घ्या काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 15:32 IST2026-04-29T15:32:05+5:302026-04-29T15:32:39+5:30
Black Dots On Car Windshield : आपण लक्ष दिलं असेल की, जवळपास सगळ्याच कारमध्ये हे डॉट्स एकसारखे असतात. चला तर पाहुयात काय हे काळे डॉट्स असण्याचं कारण...

कारच्या काचेवरील ब्लॅक डॉट्स फक्त डिझाइन नाही, ते असण्यामागे आहे सुरक्षेसंबंधी मोठं कारण; जाणून घ्या काय...
Black Dots On Car Windshield : कारच्या खिडक्या आणि विंडशील्डच्या कोपऱ्यांवर छोटे छोटे काळे डॉट्स आपण नक्कीच पाहिले असतील. जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, हे काळे छोटे डॉट्स डिझाइनचा भाग असतील. पण ते असण्यामागचं कारण वेगळंच आहे. यामागे वैज्ञानिक आणि टेक्नीकल कारण असतं. जे जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं. आपण लक्ष दिलं असेल की, जवळपास सगळ्याच कारच्या काचेवर छोटे छोटे काळे डॉट्स एकसारखे असतात. चला तर पाहुयात काय हे काळे डॉट्स असण्याचं कारण...
काचेवरील ब्लॅक डॉट्स कशासाठी?
कारच्या खिडक्या आणि विंडशील्डच्या कोपऱ्यांवर असणाऱ्या या काळ्या डॉट्सना टेक्नीकल भाषेत फ्रिट म्हणतात. ही एक खासप्रकारची सिरेमिक कोटिंग असते, जी ग्लासवर हाय टेम्प्रेचरवर बेक केली जाते. या डॉट्सचं सगळ्यात पहिलं काम विंडशील्डला मजबूती देणं असतं.
काच घट्ट बसून राहते
कारच्या काचा बॉडीसोबत जोडण्यासाठी ज्या चिकटणाऱ्या पदार्थाचा वापर केला जातो, त्याचा सूर्याच्या प्रखर किरणांपासून बचाव करणं गरजेचं असतं. हेच काळे डॉट्स त्या चिकट पदार्थाचा सूर्याच्या यूव्ही किरणांपासून बचाव करतात. ज्यामुळे काच जास्त काळ मजबूतपणे बॉडीला चिकटून राहतो.
हीट कंट्रोल
त्याशिवाय हे डॉट्स हीट कंट्रोल करण्यातही महत्वाची भूमिका बजावतात. कारच्या काचा जेव्हा गरम होतात, तेव्हा कोपऱ्यांमध्ये मधल्या भागावर तापमानाचा प्रभाव पडू शकतो. जर तापमानाचा हा फरक फार जास्त असेल तर काचेला तडा जाऊ शकतो. अशात हेच ब्लॅक डॉट्स तापमानात बदल करून हळूहळू संतुलित करतात, ज्यामुळे काचेवर अचानक पडणारा दबाव कमी होतो आणि तुटण्याचा किंवा तडा जाण्याचा धोकाही कमी होतो.
काच आकर्षक दिसते
तसेच डिझाइनच्या दृष्टीने देखील हे काळे डॉट्स महत्वाचे ठरतात. हे काळे डॉट्स कोपरे आणि साफ काचेतील एक स्मूद ट्रान्झिशन ठरतात, ज्यामुळे विंडशील्ड अधिक आकर्षक दिसते. जर हे डॉट्स नसतील तर कोपऱ्यांवर एकदम काळा रंग मिळाल्याने लुक थोडा अजब वाटू शकतो.
सोबतच हे डॉट्स ड्रायव्हरसाठी देखील महत्वाचे ठरतात. हेच कारण आहे की, अनेक कारमध्ये डॉट्स वरच्या बाजूने जास्त दिसतात. आता आपल्या लक्षात आलं असे की, कारच्या काचेवरील हे काळे छोटे छोटे डॉट्स केवळ डिझाइन नाहीत. ते सुरक्षा, मजबूतीसाठी महत्वाचे ठरतात. आता आपण कारमध्ये बसून जेव्हा हे डॉट्स बघाल तर समजाल की, ते असण्याागे किती मोठा विचार आणि टेक्नॉलॉजी आहे.