शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

देशातील फक्त एकाच रेल्वेच्या डब्यावर असतो ‘J’ लिहिलेला बोर्ड, पाहा काय होतो याचा नेमका अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:05 IST

J Letter on Railway Coach : आपणही कधीना कधी पाहिलं असेल की, काही रेल्वेच्या कोचवर ‘J’ अक्षराचं बोर्ड लावलेलं असतं. याचा नेमका काय अर्थ होतो हे जाणून घेऊया.

J Letter on Railway Coach : भारतीय रेल्वेने रोज कोट्यावधी लोक प्रवास करतात. रोज रेल्वेकडून १३ हजारांपेक्षा अधिक प्रवासी रेल्वे धावतात आणि ७ हजारांपेक्षा जास्त स्टेशनवर थांबवतात. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेने केला जाणारा प्रवास हा वेगवेगळे अनुभव देणारा असतो. अनेकजण तर नेहमीच रेल्वेने प्रवास करतात, पण तरी सुद्धा त्यांना रेल्वेबाबतच्या अनेक गोष्टी माहिती नसतात. जसे की, रेल्वेच्या कोचवर लिहिलेले कोड किंवा अक्षरं. आपणही कधीना कधी पाहिलं असेल की, काही रेल्वेच्या कोचवर ‘J’ अक्षराचं बोर्ड लावलेलं असतं. याचा नेमका काय अर्थ होतो हे जाणून घेऊया.

भारतीय रेल्वेच्या कोचवर बोर्ड का लावतात?

वेगवेगळ्या रेल्वेच्या वेगवेगळ्या कोचवर काही बोर्ड लावलेले असतात. रेल्वेकडून प्रत्येक कोचवर इंग्री लेटरद्वार ओळख दिली जाते. याने प्रवाशांना आपली जागा मिळवण्यास मदत मिळते. तसेच रेल्वेच्या व्यवस्थापानासाठी देखील हे बोर्ड फायदेशीर ठरतात. तसेच कर्मचाऱ्यांना हेही कळतं की, कोणत्या कोचमध्ये कोणती सुविधा दिली जात आहे.

कोणत्या रेल्वेवर असतो ‘J’ चा बोर्ड

‘J’अक्षराचा बोर्ड आपल्याला भारतीय रेल्वेच्या प्रत्येक रेल्वेवर बघायला मिळत नाही. केवळ एकाच रेल्वेवर आपल्याला‘J’हा बोर्ड बघायला मिळतो. या रेल्वेचं नाव आहे गरीब रथ एक्सप्रेस.

कशासाठी असतो हा बोर्ड? 

गरीब रथ एक्सप्रेसमध्ये J लिहिलेला बोर्ड बघायला मिळतो. हा बोर्ड चेअर क्लास दर्शवण्यासाठी लावलेला असतो. यात प्रवासी खुर्चीवर बसून प्रवास करतात. 

कमी भाड्यात एसी सुविधा देणारी रेल्वे

गरीब रथ एक्सप्रेस रेल्वे कमी भाडे असणारी पण पूर्णपणे एसी असलेली रेल्वे आहे. या रेल्वेत इतर रेल्वेच्या थर्ड एसीच्या तुलनेत ४० टक्के कमी भाडे असतं. हेच कारण आहे की, या रेल्वेला सामान्य लोकांची रेल्वे म्हटलं जातं.

गरीब रथ रेल्वेच्या खासियत

- गरीब रथ रेल्वेत जेवण किंवा झोपायला सीट मिळत नाही. जर आपल्याला ही सेवा हवी असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील.

- गरीब रथ एक्सप्रेसची वेळ राजधानी एक्सप्रेसप्रमाणे असते, जी आपल्या फिक्स वेळेवर येण्यासाठी ओळखली जाते. 

- गरीब रथ एक्सप्रेसमध्ये राजधानी एक्सप्रेसचे कोचही बघायला मिळतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Only Garib Rath Express has ‘J’ marked coach: Know why.

Web Summary : Garib Rath Express coaches feature a 'J' marking, indicating chair car seating. This budget-friendly, fully AC train offers lower fares than other AC trains, making it popular for affordable travel. No complimentary food/bedding; separate charges apply.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके