शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

पत्त्यामधील सर्वच राजांना आहेत मिशा पण बदामच्या राजालाच का नाहीत? जाणून घ्या रहस्य....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 12:28 PM

पत्त्यांमधील एका राजा इतरांपेक्षा वेगळा दिसतो यावर कधी तुमचं लक्ष गेलंय का?

पूर्वी सुट्ट्यांमध्ये, प्रवासात पत्ते खेळणे हा सर्वांचाच आवडता टाइमपास होता. कितीतरी लोकांच्या कितीतरी आठवणी या पत्त्यांसोबतच्या असतील. पण आता पत्ते खेळणं फारच कमी झालंय. याला कारण मोबाइल म्हणता येईल. पण जे जे लोक पत्ते खेळले असतील त्यांना पत्त्यांबाबत बरीच माहिती असेल.

पत्ता हा पुठ्ठ्यापासून किंवा प्लास्टिकपासून बनविण्यात येणारा एक हाताच्या पंजाएवढा पातळ चौकोनी कागद आहे. अनेक पत्त्यांच्या संचाला कॅट म्हणतात. परंतु एका कॅटमध्ये काही विशिष्ट पत्तेच असावे लागतात. पत्ते हे विविध बैठे खेळ खेळण्यासाठी वापरण्यात येतात.सर्व पत्त्याची एक बाजू समान असते. मात्र प्रत्येक पत्त्याची दुसरी बाजू दुसऱ्या पत्त्यापासून वेगळी असते. खेळाव्यतिरीक्त पत्त्यांचा वापर जादूमध्ये, भविष्यकथनात व पत्त्यांचे बंगले बनविण्यातही होतो. जुगारामध्येही त्यांचा वापर विशेषकरुन होतो.

पण तुम्ही कधी लक्ष दिलं असेल तर लक्षात येईल की, यातील तीन राजांना मिशा आहेत. पण बदामच्या राजाला मिशा नाहीत. तसेच तो त्याची तलवार स्वत:च्याच डोक्यात घुसडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आता हा एकटाच बदामचा राजा वेगळा का दाखवला, याबाबत वेगवेगळ्या आख्यायिक वाचायला मिळतात.

(Image Credit : Social Media)

technology.org या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, एक आख्यायिका म्हणजे पत्ते हे ब्रिटनमध्ये फ्रान्समधून आले. मुळात पत्त्यांचा आविष्कार चीनमध्ये झाला होता. तिथून वेगवेगळ्या देशांमध्ये यांचा प्रसार झाला. असे म्हणतात की, सुरूवातीला बदामच्या राजाला मिशा होत्या. कारण फ्रान्समध्ये वास्तविक राजांवरूनच यांचं चित्रण केलं गेलं होतं. आणि १५ व्या शतकात चार्ल्स राजाचा फोटो बदामच्या राजासाठी देण्यात आला होता. नंतर पुढे लाकडाच्या ब्लॉकने प्रिंटींग करताना आणि इतरही काही कारणांनी या राजाची मिशी गायब झाली आणि कुऱ्हाडही गायब झाली.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके