सायकॉलॉजीच्या स्पेलिंगची सुरूवात 'P' ने का होते? सोप्या भाषेत समजून घ्या इंटरेस्टिंग इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:15 IST2026-05-18T13:14:50+5:302026-05-18T13:15:15+5:30

Interesting Facts : Psychology हा शब्द “प्सायकॉलॉजी” ऐवजी “सायकॉलॉजी” असा का बोलला जातो? यामागे भाषेचा एक फारच इंटरेस्टिंग इतिहास दडून आहे. जो आपण जाणून घेणार आहोत. 

Why is the letter P silent in the word psychology? Know the real reason | सायकॉलॉजीच्या स्पेलिंगची सुरूवात 'P' ने का होते? सोप्या भाषेत समजून घ्या इंटरेस्टिंग इतिहास

सायकॉलॉजीच्या स्पेलिंगची सुरूवात 'P' ने का होते? सोप्या भाषेत समजून घ्या इंटरेस्टिंग इतिहास

Interesting Facts :  इंग्रजी भाषेचा आता सर्रासपणे सगळीकडे वापर केला जातो. पण इंग्रजीतील असे अनेक शब्द आहेत जे बघून लोक कन्फ्यूज होतात. काही शब्दांमध्ये अक्षरं तर लिहिली जातात, पण बोलली जात नाहीत. अशा अक्षरांना सायलेंट लेटर म्हटलं जातं. असाच एक प्रसिद्ध शब्द आहे Psychology म्हणजेच सायकॉलॉजी. हा वाचताना लोक विचारात पडतात की, या शब्दाची सुरूवात 'P' अक्षराने होते, तर मग तो बोलला का जात नाही? म्हणजे हा शब्द “प्सायकॉलॉजी” ऐवजी “सायकॉलॉजी” असा का बोलला जातो? यामागे भाषेचा एक फारच इंटरेस्टिंग इतिहास दडून आहे. जो आपण जाणून घेणार आहोत. 

कुठून आला Psychology शब्द?

Psychology हा शब्द मुळात ग्रीक भाषेतून आला आहे. हा शब्द दोन शब्द मिळून तयार झालाय. 

Psyche = मन किंवा आत्मा
Logos = अभ्यास किंवा विज्ञान

म्हणून “Psychology” म्हणजे मनाचा किंवा वर्तनाचा अभ्यास.

‘P’ सायलेंट का आहे?

ग्रीक भाषेत “Psyche” चा उच्चार काही प्रमाणात “प्साइकी” सारखा होत होता. पण जेव्हा हा शब्द लॅटिन आणि नंतर इंग्रजीमध्ये पोहोचला, तेव्हा लोकांना "Ps" चं उच्चारण अवघड जात होतं. पुढे इंग्रजी भाषा सोप्या उच्चारांकडे वळली. त्यामुळे अनेक शब्दांच्या अवघड ध्वनींना किंवा उच्चाराना हळूहळू सायलेंट करण्यात आलं. जसे की,

Psychology →    सायकॉलॉजी
Psychiatry →    सायकियाट्री
Psycho →    सायको

या शब्दांमध्ये ‘P’ लिहिणं गरजेचं असतं, ते उच्चारले जात नाहीत.

‘P’ हटवण्यात का आला नाही?

मग आता अनेकांना प्रश्न पडू शकतो की, जर ‘P’ बोलला जात नाही, तर मग स्पेलिंगमधून हटवण्यात का आला नाही? भाषा एक्सपर्ट सांगतात की, शब्दाची मूळ आणि ऐतिहासिक ओळख कायम रहावी. इंग्रजीमध्ये ग्रीक भाषेतून आलेल्या शब्दांचं स्पेलिंग बऱ्याच प्रमाणात तसेच ठेवले आहेत. यावरून हे कळून येतं की, या शब्दांचा मूळ स्त्रोत काय आहे. म्हणजे “Psychology” मध्ये ‘P’ या गोष्टीची निशाणी आहे की, हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे.

Web Title : साइकोलॉजी की स्पेलिंग 'P' से क्यों शुरू होती है: एक दिलचस्प इतिहास

Web Summary : साइकोलॉजी का 'P' ग्रीक से अंग्रेजी में ऐतिहासिक उच्चारण बदलावों के कारण मौन है। 'P' को बनाए रखने से शब्द की ग्रीक उत्पत्ति और व्युत्पत्ति संबंधी पहचान बनी रहती है।

Web Title : Why Psychology Starts with 'P': An Interesting History Explained Simply

Web Summary : Psychology's 'P' is silent due to historical pronunciation shifts from Greek to English. Retaining 'P' preserves the word's Greek origin and etymological identity, despite its silent nature.