शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील टॉयलेटच्या बाहेर WC लिहिलेलं असतं, पण त्याचा नेमका अर्थ काय? माहीत नसेल तर आता जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 18:06 IST

Railway Facts : भारतातील अनेक प्रीमिअम रेल्वेंमधील टॉयलेटच्या बाहेर आणि आतील फ्लश बटणाजवळ WC लिहिलेलं असतं. पाहा काय होतो याचा अर्थ...

Railway Facts : आपण रेल्वेने प्रवास करताना अनेक नवीन गोष्टी पाहिल्या असतील आणि अनुभवल्या असतील. रेल्वेमध्ये लावलेल्या किंवा दिसत असलेल्या गोष्टींबाबत अनेकांना प्रश्नही पडत असतील. या गोष्टींचा उद्देश काय किंवा त्या कशासाठी असतील असाही प्रश्न पडला असेलच. रेल्वेच्या छतावरील गोल झाकणं असेल, प्लॅटफॉर्मवर ठेवलेले ब्लॅक बॉक्स असतील किंवा डब्यांवर लिहिलेले वेगवेगळे कोड्स किंवा नंबर असतील, त्यांबाबत प्रश्न पडणं साहजिक आहे. सगळ्याच गोष्टींची उत्तरं आपल्या माहीत असतीलच असं नाही.

आपण रेल्वेच्या टॉयलेटचा देखील अनेकदा वापर केला असेल. भारतातील अनेक प्रीमिअम रेल्वेंमधील टॉयलेटच्या बाहेर आणि आतील फ्लश बटणाजवळ WC लिहिलेलं असतं. WC आपल्याला बोर्डवर लिहिलेलं किंवा डिजिटल मीटरवर रनिंग फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं दिसतं. पण WC का लिहिलेलं आणि याचा अर्थ तरी काय असतो, हे आज आपण पाहणार आहोत.

WC चा अर्थ काय?

आपल्याला कदाचित माहीत नसेल की, WC चा फुलफॉर्म वॉटर क्लोसेट (Water Closet) असा होतो. 'वॉटर क्लोजेट' (Water Closet - WC) म्हणजे मराठीत शौचालय, संडास किंवा पाण्याची टँक होय. हे असे शौचालय आहे, ज्यामध्ये मानवी मलविसर्जनानंतर पाणी वापरून ते स्वच्छ करण्याची व्यवस्था असते. सार्वजनिक ठिकाणी हे अनेकदा 'WC' या नावाने ओळखले जाते, ज्याचा 'पाण्याचे कपाट' किंवा टँक असा अर्थ आहे.

WC द्वारे भारतीयांसहीत परदेशी प्रवाशांना हे दर्शवलं जातं की, शौचालय कोणत्या प्रकारचं आहे. हे प्रामुख्याने पाण्याचा वापर करून स्वच्छता राखणारे एक आधुनिक शौचालय आहे. बरं WC असं फक्त रेल्वेतच नाही तर रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्ससहीत अनेक जागांवर टॉयलेट बाहेर लिहिलेलं असतं. 

गेटजवळच्या खिडकीला जास्त रॉड का?

रेल्वेच्या दरवाज्या जवळच्या असलेल्या खिडकीला जास्त रॉड असण्यामागे खूप महत्वाचं असं कारण असतं. हे कारण म्हणजे सुरक्षा असतं. दरवाज्या जवळच्या खिडकीमधून चोरी होण्याचा धोका अधिक असतो. चोर अनेकदा या खिडकीतून चोरी करताना आढळले होते. दरवाज्या जवळच्या पायऱ्यांवरून या खिडकीपर्यंत सहज पोहोचता येतं.

सामान्यपणे रात्रीच्या वेळी जेव्हा लोक झोपलेले असतात, तेव्हा चोर या खिडक्यांमधून सहजपणे प्रवाशांच्या वस्तू चोरी करत होते. ही समस्या टाळण्यासाठी या खिडक्यांना सामान्यापेक्षा अधिक रॉड लावण्यात येऊ लागले. जास्त रॉडमुळे यातील गॅप इतका कमी झाला की, त्यातून हात टाकणे अवघड होते. त्यासोबतच दरवाज्यावरील खिडकीला सुद्धा सामान्यापेक्षा अधिक रॉड लावलेले असतात. जेणेकरून रात्री रेल्वे रस्त्यात मधेच कुठे थांबली तर चोरांना त्यातून हात टाकून दरवाजा उघडता येऊ नये.

English
हिंदी सारांश
Web Title : WC Meaning on Train Toilets Explained: Railway Facts You Should Know

Web Summary : Ever wondered what 'WC' means on train toilets? It stands for Water Closet, a modern toilet using water for cleaning. More rods on train window near doors prevent theft.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके