Parle - G मधील या 'G' चा नेमका अर्थ काय होतो? कितीदा खाल्ले असतील, पण माहीत नसेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:21 IST2026-01-16T16:15:51+5:302026-01-16T16:21:20+5:30

Parle G Interesting Facts : कधी विचार केलाय का की, पारले - जी या नावातील G चा नेमका अर्थ काय होतो? क्वचितच काही लोकांनी याचा विचार केला असेल.

What is the meaning of G in parle-g, you should know | Parle - G मधील या 'G' चा नेमका अर्थ काय होतो? कितीदा खाल्ले असतील, पण माहीत नसेल उत्तर

Parle - G मधील या 'G' चा नेमका अर्थ काय होतो? कितीदा खाल्ले असतील, पण माहीत नसेल उत्तर

Parle G Interesting Facts : आपण बाजारात किंवा एखाद्या सुपर मार्केटमध्ये गेलो तर रॅकमध्ये कितीतरी वेगळ्या ब्रँडचे बिस्किट ठेवलेले दिसतात. काही गोड असतात, काही क्रीमवाले, काही खारट तर काही वेगळ्या फ्लेवरचे असतात. पण या सगळ्या बिस्किटांच्या गर्दीत एक असं नाव असतं, जे वर्षानुवर्ष त्याच नावाचं आहे. आता हे नाव कोणतं याचा अंदाज नक्कीच आपल्याला आला असेलच. होय...आम्ही सांगतोय ते पालरे-जी बाबत. आपणही अनेकदा पारले-जी बिस्किट चहात बुडवून खाल्ले असतील, याच्या टेस्टचा आनंद घेतला असेल. कित्येक वर्षांपासून आपण हे बिस्किट खात असाल. पण कधी विचार केलाय का की, पारले - जी या नावातील G चा नेमका अर्थ काय होतो? क्वचितच काही लोकांनी याचा विचार केला असेल, कारण बिस्किटाची टेस्ट इतकी हरवून टाकते की, बाकी काही डोक्यात येतंच नाही. पण आज आपण या 'G' चा अर्थ जाणून घेणार आहोत.

पारले-जीमधील 'G' चा अर्थ काय?

आपण अनेकदा या बिस्किटांच्या जाहिराती पाहिल्या असतील आणि कधी असा विचारही डोक्यात आला असेल की, पारले- जी मधील G चा अर्थ जीनिअस असेल. असं वाटलं असेल तर हे चुकीचं आहे. आपल्याला कदाचित माहीत नसेल की, जेव्हा ही बिस्किटं लॉन्च करण्यात आली होती, तेव्हा या ब्रँडचं नाव पारले - ग्लूको असं होतं. पण देशाच्या स्वातंत्र्यानंतर या बिस्किटांचं उत्पादन बंद झालं होतं. कारण देशात त्यावेळी अन्न तुटवडा जाणवत होता आणि हे बनवण्यासाठी गहू वापरले जात होते.

पण पुढे पुन्हा जेव्हा या बिस्किटांचं उत्पादन सुरू झालं तेव्हा मार्केटमध्ये इतरही अनेक ग्लूको बिस्किटांनी जागा मिळवली होती. त्यांच्या स्पर्धेत टिकता यावं म्हणून नाव पारले ग्लूको बदलून पारले G करण्यात आलं. म्हणजेच काय तर पारले जी मधील G चा खरा अर्थ ग्लूको असा होतो. नंतर कंपनीने ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी G चा वापर जीनिअस या शब्दासाठी केला. त्यामुळे अनेकांना हेच वाटतं की, G चा अर्थ जीनिअस असाच होतो.

पारलेचे मालक कोण?

देशभरात आपल्या टेस्टी बिस्किटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पारले प्रॉडक्ट्सचा मालकी हक्क हा चौहान परिवाराकडे आहे. महत्वाची बाब म्हणजे ही काही पब्लिकली लिस्टेड किंवा सरकारी कंपनी नाही. ही एक प्रायव्हेट इंडियन इंटरप्रायजेस आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही, या कंपनीची स्थापना १९२९ मध्ये मोहनलाल दयाल चौहान यांनी केली होती. आता ही कंपनी त्यांच्या वंशजांकडून चालवली जात आहे. सध्या पारले कंपनीची जबाबदारी विजय चौहान यांच्या हाती आहे. विजय चौहान हे कंपनीमध्ये अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळतात. सोबतच शरद चौहान आणि राज चौहान हे देखील कंपनी सांभाळतात.

Web Title : Parle-G के 'G' का अर्थ खुलासा: यह सिर्फ़ जीनियस से ज़्यादा है!

Web Summary : Parle-G का 'G' मूल रूप से ग्लूकोज के लिए था, जीनियस के लिए नहीं। गेहूं की कमी के कारण स्वतंत्रता के बाद उत्पादन रोक दिया गया। अन्य ग्लूकोज बिस्कुटों से प्रतिस्पर्धा करने के लिए Parle-G के रूप में फिर से शुरू किया गया। चौहान परिवार 1929 में स्थापित Parle Products का मालिक है।

Web Title : Parle-G's 'G' Meaning Revealed: More Than Just Genius!

Web Summary : Parle-G's 'G' originally stood for Glucose, not Genius. Production halted post-independence due to wheat shortages. Reintroduced as Parle-G to compete with other glucose biscuits. The Chauhan family owns Parle Products, established in 1929.