शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
4
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
5
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
6
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
7
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
8
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
9
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
10
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
11
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
12
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
13
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
14
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
15
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
16
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
17
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
18
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
19
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
20
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वेळ-काळ या संकल्पनांना इथे काहीच नाही अर्थ!; नॉर्वेमधील सोमेरॉय बेटावर मध्यरात्रीही असतो उजेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 05:18 IST

नॉर्वेच्या संसदेत येथील रहिवाशांचा अर्ज आला आहे. येथे जर रात्रच होत नसेल, तर आम्हाला घड्याळे आणि वेळेचे बंधन कशाला हवे? असा ग्रामस्थांचा सवाल आहे.

सोमेरॉय मच्छीमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात मध्यरात्र असते खरी. मात्र, सूर्य तेव्हाही तळपत असतो. नॉर्वे देशातील ट्रॉम्स कंट्री परिसरात हे अनोखे गाव आहे. मे, १८ ते जुलै, २६ या ७० दिवसांच्या काळात उंच शिखरावर वसलेल्या या व्दीपाच्या क्षीतिजावर काळोखचसरत नाही.घड्याळाचे काटे मध्यरात्री बाराचा आकडा दाखवित असतात. मात्र, त्यावेळी गावात मुले खेळत असतात, इतरांची कामे सुरू असतात, मासेमारी सुरू असते. झोपेची वेळ झाली, असे घड्याळ सांगते. मात्र, सॉमेरॉयवासी तिकडे दुर्लक्ष करतात.तिथे जेमतेम ३५0 लोक राहतात. मान्य असणारी वेळ ही संकल्पनाच हे गाव धुडकावून देण्याच्या प्रयत्नात आहे. नॉर्वेच्या संसदेत येथील रहिवाशांचा अर्ज आला आहे. येथे जर रात्रच होत नसेल, तर आम्हाला घड्याळे आणि वेळेचे बंधन कशाला हवे? असा ग्रामस्थांचा सवाल आहे.

मच्छीमार मध्यरात्रीनंतर घराबाहेर पडतात. आम्ही दमलो असलो, तरी डुलकी काढून ताजेतवाने होतो. आम्ही वेळेशी बांधलो गेलेलो नाही. आम्ही सारी घड्याळे फेकून देऊन वेळ का विसरू नये? तसे केल्याने आमचे जगणे अधिक सोपे होईल, असे ते म्हणतात.सोमेरॉयचा मुख्य उत्पन्नस्रोत पर्यटन आणि मच्छीमारीतून आहे. हे गाव जगातील पहिले वेळमुक्त क्षेत्र जाहीर झाल्यास पर्यटकांच्या आकर्षणात आणखी वाढ होईल, असे स्थानिकांना वाटते. येथे समय हा भूतकाळच होता.

सोमेरॉयमध्ये नोव्हेंबर ते जानेवारी या काळात अंधार होतो. उन्हाळ्यात मात्र येथील नागरिकांना झोप नसतेच. मुलांना ‘अंधार पडण्यापूर्वी घरी या’ असे म्हणण्याची सोय नाही. तुम्ही तसे म्हणालात, तर आॅगस्टपूर्वी तुम्ही मुलांना घरात पाहू शकणार नाही, असे लोक म्हणतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके