गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव असलेला एकुलता एक चोर, त्याचा कारनामा वाचून चक्रावेल डोकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:41 IST2026-05-08T14:40:18+5:302026-05-08T14:41:04+5:30

Stephen Blumberg Guinness Record : काही वेगळ्या कलांसाठी, वेगळ्या गोष्टींसाठी जगातील काही लोकांची नावं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली जातात. पण चक्क एका चोराचं नाव त्यात असणं म्हणजे फारच वेगळं आहे. पाहा काय केला होता त्याने कारनामा...

Stephen Blumberg Most Prolific Book Thief By Guinness Book Of World Record | गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव असलेला एकुलता एक चोर, त्याचा कारनामा वाचून चक्रावेल डोकं

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव असलेला एकुलता एक चोर, त्याचा कारनामा वाचून चक्रावेल डोकं

Stephen Blumberg Guinness Record : जगभरात भरपूर लोक रोज वेगवेगळ्या गोष्टी करून आपलं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवतात. कुणी धावण्याचा रेकॉर्ड करतं, कुणी पोहण्याचा करतं, तर कुणी लांब केसांचा, तर कुणाच्या नावावर सगळ्यात कमी उंचीचा किंवा जास्त उंचीचा रेकॉर्ड असतो. म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी किंवा त्यांचं वेगळेपण दर्शवण्यासाठी हे रेकॉर्ड केले जातात. पण आपल्याला वाचून नक्कीच धक्का बसेल की, एका चोराचं नाव त्याच्या कारनाम्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलंय. या चोराने असा काही कारनामा केला की, त्याला सगळ्यात जगातील सगळ्यात मोठा 'बुक थीफ' म्हटलं जाऊ लागलं. 

तब्बल १९ टन पुस्तकांची चोरी  

या चोराचं नाव स्टीफन ब्लमबर्ग आहे. या माणसाला पुस्तकांचं इतकं वेड होतं की, त्याने अमेरिका आणि कॅनडातील शेकडो लायब्ररींमधून पुस्तकांची चोरी केली. १९७० ते १९९० दरम्यान त्याने तब्बल ४५ राज्य आणि २६८ लायब्ररींमधून चक्क २३ हजार ६०० दुर्मीळ आणि मौल्यवान पुस्तकं चोरी केली. या पुस्तकांचं एकूण वजन जवळपास १९ टन सांगण्यात आलंय. सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे त्याने यातील एकही पुस्तक विकण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने आपल्या घरातच एक गुप्त लायब्ररी तयार केली. त्याने भिंतींमध्ये, कपाटांमध्ये ही पुस्तक ठेवली. 

पुस्तकांचं इतकं वेड...

सगळ्यात चकीत करणारी बाब म्हणजे ब्लमबर्गची चोरी करण्याची पद्धतही सिनेमातील एखाद्या हुशार चोरासारखी होती. आधी तो दिवसा लायब्ररीमध्ये जायचा, लायब्ररीचा कानाकोपरा आपल्या डोक्यात फिट करायचा. येण्या-जाण्याचे सगळे रस्ते बघायचा आणि मग रात्री चोरी करायचा. त्याने अनेक आयडी कार्डही बनवून ठेवले होते. 

असं सांगतात की, ब्लमबर्गला बालपणी 'स्किजोइड पर्सनालिटी डिसऑर्डर' नावाचा मानसिक आजार होता. या मानसिक आजारामुळे तो लोकांमध्ये मिक्स नाही व्हायचा, त्यांच्यापासून दूर रहायचा. तो सतत पुस्तकांच्या विश्वात हरवलेला रहायचा. त्याला वाटायचं की, दुर्मीळ पुस्तकांची संस्थांना काळजी नाही. त्यामुळे ते वाचवण्यासाठी 'जबाबदारी' त्याचीच आहे. 

मित्रानेच केला भांडाफोड

ब्लमबर्गच्या कहाणीचा शेवटही वाईटच झाला. त्याचा मित्र केनेथ रोड्स याने त्याच्या या कारनाम्याचा भांडाफोड केला. त्याने एफबीआयला सगळी माहिती दिली. २० मार्च १९९० ला जेव्हा पोलीस त्याच्या घरी गेले, तेव्हा समोरचा नजारा पाहून ते अवाक् जाले. किचन, बेडरूम, बाथरूम, हॉल सगळीकडे फक्त पुस्तकंच पु्स्तकं होती. १९९१ मध्ये त्याला कोर्टाने दोषी ठरवलं आणि ७१ महिन्यांची शिक्षा सुनावली. तुरूंगातून बाहेर आल्यावरही स्टीफन ब्लमबर्गचं नाव जगातील सगळ्यात रहस्यमयी आणि सगळ्यात मोठ्या पुस्तक चोराच्या रूपात इतिहासात नोंदवलं गेलं.

Web Title : स्टीफन ब्लमबर्ग: गिनीज में दर्ज किताबों का चोर, अविश्वसनीय चोरी।

Web Summary : स्टीफन ब्लमबर्ग, किताबों के दीवाने ने अमेरिकी और कनाडाई पुस्तकालयों से 23,600 दुर्लभ किताबें (19 टन) चुराईं। उसने एक गुप्त घरेलू पुस्तकालय बनाया, उन्हें बेचा नहीं। एक दोस्त द्वारा उजागर, उसे जेल हुई, हमेशा इतिहास के सबसे बड़े पुस्तक चोर के रूप में जाना जाता है।

Web Title : Stephen Blumberg: The Guinness-recognized book thief and his unbelievable heist.

Web Summary : Stephen Blumberg, a book obsessive, stole 23,600 rare books (19 tons) from US and Canadian libraries. He created a secret home library, not selling them. Exposed by a friend, he was jailed, forever known as history's biggest book thief.