शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक उंदरांनी या देशात घातले थैमान, कुरतडताहेत लोकांचे डोळे आणि कान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 08:55 IST

International News: एकीकडे जग कोरोना विषाणूच्या थैमानामुळे त्रस्त असताना दुसरीकडे या देशातील लोक मात्र वेगळ्याच समस्येने त्रस्त आहेत.

मेलबर्न - एकीकडे जग कोरोना विषाणूच्या थैमानामुळे त्रस्त असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियन लोक मात्र वेगळ्याच समस्येने त्रस्त आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या नरभक्षी उंदरांनी प्रचंड थैमान घातले आहे. येथील जवळपास प्रत्येक घरात उंदरांनी उच्छाद घातला असून, हे उंदीर आता माणसांवरही हल्ले करत असल्याचे वृत्त आहे. (rats have invaded in Australia, biting people's eyes and ears)हल्लीच ऑस्ट्रेलियामध्ये एका शेतकऱ्याच्या पत्नीवर उंदरांनी हल्ला केला. या महिलेचे डोळे उंदरांनी कुरतडले. या महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही महिला अचानक झोपेतून उठली असता उंदीर डोळे कुरतडत असल्याचे तिला दिसून आले. त्यानंतर या महिलेच्या पतीने तिला रुग्णालयात दाखल केले.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या ३० वर्षांतील उंदरांचा हा सर्वात भयंकर प्रकोप आहे. आतापर्यंत अनेक जणांवर उंदरांनी हल्ला केला आहे. हल्लीच सिडनीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा कान उंदरांनी चावला होता. त्याने सांगितले की, झोपेत असताना माझी त्वचा कुणीतरी कुरतडत असल्याचे मला जाणवले. लाईट सुरू करून पाहिले असता मी पाहिले की, एक उंदीर माझा कान चावत होता. ऑस्ट्रेलियामध्ये अशाप्रकारे उच्छाद मांडून ठेवला आहे. काही घरांमध्ये उंदीर आगीसारख्या घटनांना कारणीभूत ठरत आहेत. शेतकऱ्यांना उंदरांमुळे सर्वात जास्त त्रास होत आहे. उंदीर धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. असे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत ज्यामध्ये शेकडो उंदीर दिसत आहेत. अनेक लोकांनी उंदरांनी हल्ला केल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका महिलेने सांगितले की, ती दररोज सुमारे ५० उंदरांना मारून फेकत आहे. तर एका महिलेने लिहिले की, उंदरांमुळे तिची नवी कार नुकसानग्रस्त झाली आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयAustraliaआॅस्ट्रेलिया