देशातील सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन जिथे आहेत तब्बल २३ प्लॅटफॉर्म, रोज १० लाखांपेक्षा जास्त प्रवासी ये-जा करतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:56 IST2026-05-18T13:55:36+5:302026-05-18T13:56:08+5:30
Railway Interesting Facts : भारतात अनेक मोठे रेल्वे स्टेशन आहेत, पण एकच असं रेल्वे स्टेशन आहे जिथे तब्बल २३ प्लॅटफॉर्म आहेत. पाहा कोणतं आहे हे रेल्वे स्टेशन...

देशातील सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन जिथे आहेत तब्बल २३ प्लॅटफॉर्म, रोज १० लाखांपेक्षा जास्त प्रवासी ये-जा करतात
Railway Interesting Facts : भारतीय रेल्वे जगातील चौथं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखलं जातं. दिवसेंदिवस भारतीय रेल्वे कात टाकत नवीन गोष्टींचा समावेश करत आहे. अनेक नवीन रेल्वे स्टेशन उभारण्यात आलेत आणि जे जुने स्टेशन आहेत त्यांच्यात सुधारणा करण्यात आली. देशात कितीतरी ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहेत. पण भारतात असं रेल्वे स्टेशन आहे ज्याची चर्चा जगभरात बघायला मिळते. या रेल्वे स्टेशनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे इथे तब्बल २३ प्लॅटफॉर्म आहेत. आपणही अनेक रेल्वे स्टेशन पाहिले असतील आणि प्लॅटफॉर्मही पाहिले असतील. पण २३ प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन कोणतं हे आपल्याला माहीत आहे का? जर आपल्याला या स्टेशनचं नाव माहीत नसेल तर तेच आपण जाणून घेणार आहोत.
भारतातील स्टेशनची बातच न्यारी...
भारतात असे अनेक रेल्वे स्टेशन आहेत ज्यांच्या रहस्यांची चर्चा लोकांमध्ये नेहमीच बघायला मिळते. बरेच रेल्वे स्टेशन हे आपल्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहेत. काही रेल्वे स्टेशन दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहेत, तर काही रेल्वे स्टेशन हे आपल्या भव्यतेसाठी ओळखले जातात. पण आज आम्ही आपल्याला देशातील सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म असलेल्या रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत.
कोणत्या स्टेशनवर २३ प्लॅटफॉर्म?
भारतातील २३ प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन हे पश्चिम बंगालमधील हावडा जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. याच रेल्वे स्टेशनवर सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल २३ प्लॅटफॉर्म आहेत. हे देशातील सगळ्यात मोठं आणि सगळ्यात व्यस्त रेल्वे स्टेशनपैकी एक आहे. आपल्याचा वाचून आश्चर्य वाटेल की, इथून दररोज साधारण १० लाखांपेक्षा जास्त प्रवासी ये-जा करतात. इथे दोन टर्मिनल आहे, ज्यातील पहिल्या टर्मिनलवर १ ते १५ प्लॅटफॉर्म आहेत आणि दुसऱ्या टर्मिनलवर १७ ते २३ प्लॅटफॉर्म आहेत.

हावडा जंक्शनची खासियत
हावडा जंक्शन प्रसिद्ध असण्यामागे केवळ कारण नसून इतरही अनेक कारणे आहेत. हे स्टेशन १८५४ मध्ये सुरू झालं होतं आणि रोज इथून लाखो प्रवासी ये-जा करतात. इथून रोज तब्बल ६०० पेक्षा जास्त रेल्वे धावतात. आणखी एक खास बाब म्हणजे या स्टेशनच्या दोन प्लॅटफॉर्ममधून एक रस्ताही जातो, ज्यावर कार, कॅब पार्क असतात. भव्य इमारत आणि पारंपारिक क्लॉक टॉवरसाठी सुद्धा हावडा जंक्शन ओळखलं जातं.