लंडन : गांधीजींच्या पुतळ्याचे १४ मार्च रोजी अनावरण

By Admin | Updated: February 23, 2015 05:44 IST2015-02-22T23:03:40+5:302015-02-23T05:44:24+5:30

महात्मा गांधी यांच्या ब्राँझच्या पुतळ्याचे येथील ब्रिटनच्या ऐतिहासिक पार्लमेंट स्क्वेअरमध्ये १४ मार्च रोजी अनावरण होणार आहे.

London: Unveiling the statue of Gandhiji on March 14 | लंडन : गांधीजींच्या पुतळ्याचे १४ मार्च रोजी अनावरण

लंडन : गांधीजींच्या पुतळ्याचे १४ मार्च रोजी अनावरण

लंडन : महात्मा गांधी यांच्या ब्राँझच्या पुतळ्याचे येथील ब्रिटनच्या ऐतिहासिक पार्लमेंट स्क्वेअरमध्ये १४ मार्च रोजी अनावरण होणार आहे. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी रविवारी ही घोषणा केली. गांधी पुतळा स्मृती विश्वस्तांनी या कामासाठी एक दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त देणगी मिळविल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
या कामासाठी ख्यातनाम पोलाद उत्पादक लक्ष्मी एन. मित्तल यांनी एक लाख पौंड दिले आहेत व इन्फोसिस बोर्डचे अध्यक्ष के. व्ही. कामथ यांनी गेल्या काही आठवड्यांत अडीच लाख पौंड जमविले आहेत. पुतळा अनावरण कार्यक्रमास बहुधा अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित राहतील. (वृत्तसंस्था)


 

Web Title: London: Unveiling the statue of Gandhiji on March 14