शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

७ आंब्यांसाठी ४ रखवालदार अन् ६ कुत्रे तैनात; असं आहे तरी काय आंब्यांत? किंमत ऐकून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 10:19 IST

जपानी मातीत पिकणारा आंबा भारतीय मातीत पिकवून दाखवला; आंतररराष्ट्रीय बाजारात जबरदस्त भाव मिळणार

जबलपूर: व्हीव्हीआयपींना मिळणारी झेड प्लस सुरक्षा तुम्ही पाहिली असेल. अनेकदा तुम्ही या सुरक्षेबद्दल ऐकलंदेखील असेल. पण आंब्यांना मिळणारी कडेकोट सुरक्षा तुम्ही कधी पाहिलीय? मध्य प्रदेशातल्या जबलपूरमधील ७ आंब्यांना २४ तास सुरक्षा दिली जात आहे. आंबे बागायतदारानं सुरक्षेसाठी ४ रखवालदार आणि ६ कुत्रे तैनात केले आहेत. आंबे चोरीला जाऊ नयेत यासाठी रखवालदार दिवसरात्र डोळ्यात तैल घाऊन पहारा देत आहेत. या अनोख्या व्हीव्हीआयपी संरक्षणाची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.बाबो! एका आंब्याची किंमत २.७० लाख; कृषी अधिकारी हैराण, पाहणी करणार

जबलपूरमध्ये २४ तास कडेकोट बंदोबस्तात असलेल्या आंब्यांची किंमत शेकडो, हजारो नव्हे, तर लाखोंच्या घरात आहे. या आंब्याचं नाव टायगो नो टमैंगोश असं आहे. हा आंबा प्रामुख्यानं जपानमध्ये आढळून येतो. या एका आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात २ लाख ७० हजार रुपये इतका दर मिळतो अशी माहिती बगिच्याचे मालक संकल्प सिंह परिहार यांनी दिली. 

परिहार यांच्या बागेत एकूण १४ प्रजातींचे आंबे आहेत. बगिच्यात टायगो नो टमैंगोश प्रजातीचे केवळ सातच आंबे आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ४ रखवालदार आणि ६ कुत्रे तैनात केले गेले आहेत. या आंब्यांना एग ऑफ सन असंही म्हटलं जातं. कारण हा आंबा पिकल्यावर लाल आणि पिवळ्या रंगाचा दिसतो. एका आंब्याचं वजन जवळपास ९०० ग्रॅम असतं. चवीला तो अतिशय गोड असतो. ही आहे फळांची 'महाराणी'! एका आंब्याची किंमत 1000 रुपये, नाव आहे 'नूरजहां'

जपानमध्ये टायगो नो टमैंगोश आंब्याचं उत्पादन संरक्षक वातावरणात घेतलं जातं. मात्र परिहार यांनी त्यांच्या ओसाड जमिनीवर खुल्या वातावरणात या आंब्याचं उत्पादन घेतलं. लाखो रुपये किंमत असलेल्या आंब्याची बातमी जबलपूरमध्ये चौफेर पसरली. त्यामुळे परिहार यांना नुकसान सहन करावं लागलं. बगिच्यामध्ये चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे आता परिहार यांनी आंब्याच्या संरक्षणासाठी कुत्रे आणि रखवालदार ठेवले आहेत. चोरीच्या घटना रोखण्यासाठी त्यांच्याकडून दिवसरात्र पहारा दिला जात आहे.

टॅग्स :Mangoआंबा