मुंबईच्या प्रसिद्ध मरीन ड्राइव्हवर पडून असलेले मोठाले दगड आले कुठून, त्यांचं काम काय? जाणून घ्या खास गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:54 IST2026-05-09T11:51:55+5:302026-05-09T11:54:10+5:30

Interesting Facts : बाहेरून मुंबईत आलेल्या अनेकांना प्रश्न पडतो की मरीन डाइव्हवरील हे दगड नेमके काय आहेत आणि त्यांचा उपयोग काय आहे?

Interesting facts about Mumbai marine drive tetrapods structures and its work | मुंबईच्या प्रसिद्ध मरीन ड्राइव्हवर पडून असलेले मोठाले दगड आले कुठून, त्यांचं काम काय? जाणून घ्या खास गोष्टी...

मुंबईच्या प्रसिद्ध मरीन ड्राइव्हवर पडून असलेले मोठाले दगड आले कुठून, त्यांचं काम काय? जाणून घ्या खास गोष्टी...

Interesting Facts : स्वप्नांची दुनिया मुंबई सगळ्यांनाच आपल्याकडे आकर्षित करते. मुंबईत राहणारे लोक असो वा बाहेरून आलेले लोक असोत, ते सामान्यपणे सगळ्यात आधी भेट देतात ते 'क्वीन्स नेकलेस'ला म्हणजेच मरीन ड्राइव्हला. आपणही अनेकदा मरीन ड्राइव्हवर जाऊन अंथाग समुद्राचा आनंद घेतला असेल. मरीन ड्राइव्ह मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे, जिथे सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांची मोठी गर्दी असते.

साधारण ३.६ किलोमीटर लांबीच्या या समुद्रकिनारी रस्त्यावर काही लोक सायकल चालवताना, तर काही जॉगिंग करताना दिसतात. अनेक जण येथे फक्त समुद्रकिनारी बसून सूर्यास्त पाहण्यासाठी येतात. येथे आल्यानंतर वेळ काही क्षण थांबून गेल्यासारखा वाटतो. मरीन ड्राइव्हची आणखी एक खास गोष्ट म्हणजे समुद्रकिनारी ठेवलेले मोठमोठे काँक्रीटचे दगड. हे दगड तिथे कसे आलेत हे मुंबईतील लोकांना कदाचित माहीत असेल, पण बाहेरून आलेल्या अनेकांना प्रश्न पडतो की हे दगड नेमके काय आहेत आणि त्यांचा उपयोग काय आहे?

मरीन ड्राइव्ह इतका प्रसिद्ध का आहे?

मरीन ड्राइव्ह हे मुंबईकरांसोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. येथे समुद्राचं सुंदर दृश्य अनुभवता येतं. तसेच मुंबई मॅरेथॉन, गणेश विसर्जन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या ठिकाणाचे महत्त्व आणखी वाढते. १९४० मध्ये बांधण्यात आलेला हा ऐतिहासिक रस्ता अधिकृतपणे नेताजी सुभाषचंद्र बोस रोड म्हणून ओळखला जातो. येथून दिसणारा सूर्यास्त हा मुंबईतील अविस्मरणीय अनुभवांपैकी एक मानला जातो.

मरीन ड्राइव्हवरील दगड काय आहेत?

समुद्रकिनारी दिसणाऱ्या चार पायांच्या काँक्रीट संरचनांना “टेट्रापॉड्स” असं म्हणतात. हे टेट्रापॉड्स अनेक वर्षांपासून मरीन ड्राइव्ह आणि आसपासच्या भागाचे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करत आहेत. साधारण १२,००० हून अधिक टेट्रापॉड्स समुद्रकिनाऱ्यावर लावले आहेत. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे किनाऱ्याची धूप रोखणे आणि प्रचंड लाटांपासून रस्ता व इमारतींचे संरक्षण करणे.

टेट्रापॉड्स कसे काम करतात?

टेट्रापॉड्स हे जड काँक्रीट ब्लॉक्स असतात, ज्यांना चार बाहेर आलेले पाय असतात. हे एकमेकांत अडकतील अशा पद्धतीने रचले जातात, पण त्यांच्यात जागाही राहते. यामुळे समुद्राच्या लाटा थेट भिंतीवर आदळण्याऐवजी या संरचनांभोवती पसरतात आणि त्यांची ताकद कमी होते. त्यामुळे भरतीच्या वेळी होणारे नुकसान कमी होते. एका टेट्रापॉडचे वजन साधारण २ टनांपासून १० टनांपर्यंत असू शकते. त्यांची रचना अशी असते की ते वादळातही स्थिर राहतात.

मुंबईत टेट्रापॉड्स कधी बसवले गेले?

मरीन ड्राइव्हवरील टेट्रापॉड्स सर्वप्रथम दक्षिण मुंबईचे संरक्षण करण्यासाठी १९९० च्या दशकाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात बसवण्यात आले. यापूर्वी १९६० ते १९६५ दरम्यान बसवलेले काही जुने टेट्रापॉड्स कालांतराने खराब झाले होते. १९८२ ते २००२ दरम्यान त्यातील काही बदलण्यात आले. नैसर्गिक हालचाली आणि किनारी रस्ता प्रकल्पामुळे काही टेट्रापॉड्स हटवावेही लागले. आज हे टेट्रापॉड्स मरीन ड्राइव्हचे एक वेगळे आकर्षण बनले आहेत आणि समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे कामही करत आहेत.

Web Title : मुंबई का मरीन ड्राइव: बड़े पत्थरों का रहस्य और उद्देश्य

Web Summary : मुंबई के मरीन ड्राइव पर बड़े कंक्रीट के टेट्रापॉड लहरों से कटाव रोकते हैं। 1990 के दशक में स्थापित, वे प्रतिष्ठित सैरगाह और आसपास की इमारतों की सुरक्षा करते हैं, जो अब एक प्रमुख आकर्षण हैं।

Web Title : Marine Drive Mumbai: Origin and Purpose of the Large Stones

Web Summary : Mumbai's Marine Drive features large concrete structures called tetrapods. These protect the coastline from erosion and waves. Installed in the 1990s, they're now a key attraction, safeguarding the iconic promenade and nearby structures from the sea's impact.