शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

तोकडे झाले चिअरगर्ल्सचे कपडे

By admin | Updated: May 7, 2014 08:01 IST

आयपीएलमध्ये आकर्षणाचा केंद्र असलेल्या चिअरलीडर्सचा (गर्ल्स) पेहराव यूएईतून भारतात दाखल होताच पूर्णपणे बदलला आहे.

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आकर्षणाचा केंद्र असलेल्या चिअरलीडर्सचा (गर्ल्स) पेहराव यूएईतून भारतात दाखल होताच पूर्णपणे बदलला आहे. आयपीएल- ७च्या पहिल्या टप्यात यूएईमध्ये याच मुली डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे झाकलेल्या दिसायच्या. भारतात दाखल होताच त्यांचे कपडे अचानक तोकडे झाले. दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर आतापर्यंत पार पडलेल्या दोन्ही सामन्यांत चिअरगर्ल्सचा ‘जलवा’ पाहण्यासारखा होता. सहाव्या पर्वात फिक्सिंग आणि बेटिंगचे बिंग फुटताच बीसीसीआयच्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुढील पर्वात चिअरलीडर्स दिसणार नसल्याचा दावा केला होता. गेल्या वर्षी काही वेळेसाठी अंतरिम अध्यक्षपदी विराजमान झालेले जगमोहन दालमिया यांनी खच्चून भरलेल्या पत्रकार परिषदेत आयपीएलच्या स्वच्छतेसाठी ब्ल्यूप्रिंट तयार केल्याचे ठासून सांगितले. त्यात चिअरलीडर्सना स्पर्धेबाहेर ठेवण्याचे ठरले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात उपाध्यक्ष रवी सावंत यांनी नाशिकमध्ये सातव्या पर्वात चिअरगर्ल्स राहणार नाही, असे स्पष्ट केले. आयपीएलला स्वच्छ आणि पारदर्शी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नुकतेच माजी कर्णधार सुनील गावसकर यांना आयपीएलच्या अंतरिम अध्यक्षपदी आणण्याचे निर्देश दिले. गावसकर यांच्या नियुक्तीनंतरही आयपीएलमध्ये मोठे बदल घडून आले नाहीत. मुस्लिमबहुल देश असलेल्या यूएईत पहिल्या टप्प्यातील २० सामने शारजा, दुबई आणि अबुधाबी येथे पार पडले. प्रत्येक सामन्यात चिअरलीडर्सची उपस्थिती होतीच; पण कुठल्याही वादाला तोंड फुटू नये, यासाठी डोक्यापासून पायापर्यंत त्यांचे शरीर कपड्यांनी झाकलेले होते. भारतात आयपीएल दाखल होताच परिस्थिती बदलली. मागच्या सत्रात पुणे वॉरियर्सने आपल्या संघाच्या चिअरलीडर्सना पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सादर केले होते. विशेष असे, की आयपीएलच्या पहिल्या पर्वापासूनच चिअरलीडर्सच्या उपस्थितीबद्दल वाद उपस्थित होऊ लागला; पण आयपीएल पुढे सरकत गेल्याने हे वाद निवळले. गतवर्षी दालमिया आणि सावंत यांच्या वक्तव्यानंतर मात्र सातव्या पर्वात चिअरलीडर्स नावाचा प्रकार नसेल, याची खात्री पटली होती; पण चिअरलीडर्सचा मैदानावरील धिंगाणा अद्याप कायम आहे. (वृत्तसंस्था)