बोंबला! लग्न लागणार इतक्यात मंडपातच नवरदेव अन् पंडिताची धुलाई, कारण वाचून व्हाल अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 11:13 AM2021-05-17T11:13:24+5:302021-05-17T11:23:29+5:30

नवरदेव मंडपात पोहोचला. अचानक काहीतरी गडबड झाली. नवरदेवाला फिट आली आणि सगळा गोंधळ झाला. नवरदेवाची ही स्थिती पाहून सगळेच हैराण झाले.

Groom suddenly had an epileptic seizure and the whole affair worsened | बोंबला! लग्न लागणार इतक्यात मंडपातच नवरदेव अन् पंडिताची धुलाई, कारण वाचून व्हाल अवाक्....

बोंबला! लग्न लागणार इतक्यात मंडपातच नवरदेव अन् पंडिताची धुलाई, कारण वाचून व्हाल अवाक्....

Next

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील एका गावात नवरदेव आपली वरात घेऊन पोहोचला होता. पण कदाचित हे लग्न त्याच्या नशीबातच नव्हतं. नवरदेव आणि पाहुण्यांना याचा अंदाजही नसेल की, वेळेवर अचानक असं काही होईल की, लग्न होणं तर दूरच, पण जीव वाचवणंही कठिण होईल. वरात नवरीच्या घरी पोहोचली तेव्हा सप्तपदीची तयारी सुरू होती. नवरदेव मंडपात पोहोचला. अचानक काहीतरी गडबड झाली. नवरदेवाला फिट आली आणि सगळा गोंधळ झाला. नवरदेवाची ही स्थिती पाहून सगळेच हैराण झाले.

हा प्रकार घडल्यावर लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला तर नवरीकडील लोक चांगलेच संतापले. मग काय, ज्या मंडपात सप्तपदीची तयारी सुरू होती तो मंडप युद्धाचं मैदान झाला. नवरदेवाला मिरगीचा झटका येताच नवरदेवाकडील लोकांनी नवरदेवाचा हा आजार लपवण्याचा आरोप करत नवरीकडच्या लोकांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर तर आणखीनच हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. वर-वधू दोन्ही पक्षाकडील वाद वाढत गेला. वाद इतका वाढला की, सगळे एकमेकांना मारझोड करू लागले. (हे पण वाचा : सनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....)

नवरीकडच्या लोकांनी नवरदेवाकडून आलेल्या पंडिताला मारहाणार केली. पण या लोकांचा राग शांत झाला नाही. नवरदेव जेव्हा शुद्धीवर आला तर त्याच्याही धुलाई सुरू केली. इतकंच नाही तर नवरदेवाकडून आलेल्या सर्व पाहुण्यांना बंदी बनवण्यात आलं. नवरीकडून हुंड्यात जे पैसे दिले होते ते परत मागितले गेले. (हे पण वाचा : भागमभाग! लग्नात २० पेक्षा जास्त जणांची गर्दी; पोलीस येताच नवरा नवरीनं भिंतीवरून उडी मारून धूम ठोकल)

नवरदेवासोबत पंडिताला मारल्याची आणि पाहुण्यांना बंदी बनवल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा हा वाद शांत करण्यात आला. पण तरी पूर्णपणे वाद मिटला नव्हता. नवरीकडील लोकांनी पाहुण्यांना सोडलं. पण या गोष्टीवर अडून बसले की, जोपर्यंत हुंड्याचे पैसे परत करत नाही तोपर्यंत नवरदेवाला सोडणार नाही. पाहुणे गेल्यावरही नवरदेवाला सोडलं नाही.
 

Web Title: Groom suddenly had an epileptic seizure and the whole affair worsened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.