सनकी तरूण कुऱ्हाड घेऊन तिच्या लग्नात पोहोचला, नवरदेवासमोरच नवरीसोबत केला हा कारनामा....

Published: May 15, 2021 12:20 PM2021-05-15T12:20:39+5:302021-05-15T12:34:40+5:30

या संपूर्ण घटनेनंतर नवरदेवाकडील लोकांनी नवरीला नेण्यास नकार दिला. पण नंतर पंचायत बोलण्यात आली तेव्हा दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला घरी घेऊन गेला.

उत्तर प्रदेशमधून लग्नात फसवणूक झाल्याच्या, गुन्हेगारीच्या विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. अशीच एका लग्नाची विचित्र घटना नुकतीच समोर आली आहे. गोरखपूरमधून एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने एका तरूणीच्या लग्नात चांगलाच धिंगाणा घातला.

या तरूणाने तरूणीच्या नवरदेवासमोरच कुऱ्हाड घेऊन लग्नात गोंधळ घातला आणि नंतर नवरीच्या भांगेत कुंकू भरलं. यानंतर लोकांनी या तरूणाला पकडून त्याची चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाले केलं. पोलिसांनी त्याला नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

रात्री साधारण १२ वाजले होते आणि स्टेजवर वरमाला घालण्याचा रिवाज सुरू होता. नवरी-नवरदेव स्टेजवर होते. दोघेही एकमेकांना हार घालणारच होते की, इतक्यात पिचराइच येथे राहणारा गोलू विश्वकर्मा कुऱ्हाड घेऊन थेट स्टेजवर आला.

त्याने नवरदेवावर कुऱ्हाड रोखली. नवरदेवाला काही समजायच्या आत त्याने असं काही केलं की, बघणारे हैराण झाले. नवरदेवाला कुऱ्हाडीचा धाक दाखवत सनकी प्रियकराने नवरीच्या भांगेत कुंकू भरलं.

कुणाच्या काहीच ध्यानीमनी नसताना इतका मोठा गोंधळ झाल्यावर नवरी आणि नवरदेवाकडील लोकांना एकच धक्का बसला. नवरदेव तर बघतच राहिला.

घटनेनंतर परिवारातील लोकांनी गावातील लोकांच्या मदतीने आरोपी तरूणाला पकडलं. त्यानंतर त्याची चांगलीच धुलाई केली. नंतर लगेच पोलिसांना बोलवून त्याला त्यांच्या ताब्यात दिलं. तो जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

या संपूर्ण घटनेनंतर नवरदेवाकडील लोकांनी नवरीला नेण्यास नकार दिला. पण नंतर पंचायत बोलण्यात आली तेव्हा दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला घरी घेऊन गेला.

खोराबार भागातील तरूणीचं लग्न देवरिया जिल्ह्यातील तरूणाशी ठरलं होतं. मुलीकडच्यांनी लग्नाची सगळी तयारी केली होती. वरातही ठरलेल्या वेळेवर पोहोचली. त्यानंतर पूजा झाल्यावर हार घालण्याचा रिवाज सुरू होता.

Read in English