This girl in America has an extremely rare condition where her heart beats outside of her chest | फारच दुर्मीळ आजाराशी लढत आहे ही मुलगी, शरीराच्या बाहेर धडधडतं तिचं हृदय...

फारच दुर्मीळ आजाराशी लढत आहे ही मुलगी, शरीराच्या बाहेर धडधडतं तिचं हृदय...

अमेरिकेत राहणारी ही मुलगी फारच दुर्मीळ अशा समस्येतून जात आहे. Virsaviya Goncharova नावाच्या या मुलीला पेंटालॉजी ऑफ कंट्रोल नावाची कंडीशन आहे. ज्यामुळे गर्भातच तिच्या मांसपेशी आणि छातीचा भाग वेगळ्या प्रकारे फॉर्म झाला होता. गोनचारोवाला तिच्या या समस्येमुळे वेदना जाणवत नाही. पण या कंडीशनमुळे तिचं हृदय फार जास्त एक्सपोज झालं आहे म्हणजे ते छातीतून बाहेर आलं आहे.

इतकेच नाही तर तिच्या हृदयात छिद्रही आहे. गोनचारोवाला तिच्या या स्थितीमुळे नेहमीच हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागतं. २०२० च्या सुरूवातीला तिची ऑक्सीजन लेव्हल फार वेगाने कमी झाला होती ज्यानंतर तिला इमरजन्सी रूममध्ये नेण्यात आलं होतं. दोन आठवड्यांनंतर गोनचारोवाची ऑक्सीजन लेव्हल सामान्य झाली होती.

दारी म्हणजे या मुलीच्या आईने २०१५ मध्ये रशियातून अमेरिकेत येण्याचा निर्णय घेतला होता. जेणेकरून अमेरिकेत मुलीची सर्जरी करता येईल. ज्याने तिच्या हृदयाचं छिद्र बंद होईल आणि तिची मुलगी सामान्य जीवन जगेल. गोनचारोवाला हाय ब्लड प्रेशरची समस्याही असल्याने तिच्या फुप्फुसाच्या धमण्यांवरही प्रभाव पडतो आहे. त्यामुळे तिच्यावर सर्जरीही शक्य झाली नाही.

गोनचारोवा सांगते की,  कधी-कधी तिच्या ऑक्सीजनची लेव्हल फार कमी होते. ज्यामुळे तिला चक्कर आल्यासारखं वाटतं. मात्र असं असलं तरी तिला अॅक्टिव राहणं आवडतं. तिला मित्रांसोबत डान्स करणं आणि गाणं आवडतं. कोरोना काळात ती मित्रांना भेटू शकली नाही.

गोनचारोवा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव आहे आणि नेहमीच आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करत असते. ती यावर तिच्या लाइफसंबंधी अपडेट्सही देत असते. गोनाचारोवाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक पॉझिटिव्ह मेसेज वाचायला मिळतात. ती लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया वाचून आनंदी होते. गोनचारोवा सांगते की, भलेही तिचं हृदय इतरांपेक्षा वेगळं असेल, पण हे फार अनोखं आहे आणि तिला ते आवडतं'.
 

Web Title: This girl in America has an extremely rare condition where her heart beats outside of her chest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.