उंटाच्या अश्रूंमध्ये दडलंय मोठं रहस्य, कोब्राच्या विषालाही करू शकतात निकामी; संशोधनातून दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 15:08 IST2026-05-18T15:04:13+5:302026-05-18T15:08:09+5:30

Camel Tears Can Act As Antivenom Against Cobra : एका नव्या संशोधनानुसार, उंटाच्या अश्रूंमध्ये असे काही घटक सापडले आहेत जे भविष्यात सापाच्या विषावर औषध तयार करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

Camel tears can act as antivenom against cobra snake bike claim research | उंटाच्या अश्रूंमध्ये दडलंय मोठं रहस्य, कोब्राच्या विषालाही करू शकतात निकामी; संशोधनातून दावा...

उंटाच्या अश्रूंमध्ये दडलंय मोठं रहस्य, कोब्राच्या विषालाही करू शकतात निकामी; संशोधनातून दावा...

Camel Tears Can Act As Antivenom Against Cobra : उंट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वाळवंट, लांबचा प्रवास आणि त्याचं पौष्टिक दूध येतं. पण आता उंट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यावेळी चर्चा त्याच्या दुधाची नाही, तर अश्रूंमध्ये आढळलेल्या खास तत्वांची आहे. एका नव्या संशोधनानुसार, उंटाच्या अश्रूंमध्ये असे काही घटक सापडले आहेत जे भविष्यात सापाच्या विषावर औषध तयार करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. ही गोष्ट ऐकायला जरी आश्चर्यकारक वाटत असली, तरी वैज्ञानिक याचा गंभीरपणे अभ्यास करत आहेत. मात्र, हे संशोधन अजून सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने याला अंतिम निष्कर्ष मानणं योग्य नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.

उंटाच्या अश्रूंमध्ये काय विशेष आढळलं?

दुबईतील सेंट्रल व्हेटरनरी रिसर्च लॅबोरेटरी (CVRL) आणि भारतातील राष्ट्रीय उष्ट्र संशोधन केंद्र (NRCC) यांनी उंटांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर संशोधन केलं. या अभ्यासात वैज्ञानिकांचं उंटाच्या शरीरात तयार होणाऱ्या एका खास प्रकारच्या अँटीबॉडीकडे लक्ष गेलं. यांना “नॅनोबॉडी” म्हटलं जातं. या सामान्य अँटीबॉडीपेक्षा आकाराने खूप लहान असतात. त्यामुळे त्या शरीरात वेगाने काम करू शकतात आणि विषारी घटकांपर्यंत सहज पोहोचू शकतात. संशोधनात असं दिसून आलं की या नॅनोबॉडी काही विषारी सापांच्या विषाचा प्रभाव कमी करण्यास मदत करू शकतात. विशेष म्हणजे, या घटकांचा काही अंश उंटाच्या अश्रूंमध्येही आढळला.

भारत आणि दुबईतील वैज्ञानिकांचा अभ्यास

संशोधनादरम्यान उंटांना अतिशय कमी प्रमाणात सापाचं विष देण्यात आलं आणि त्यानंतर शरीराची प्रतिक्रिया तपासण्यात आली. विविध नमुन्यांची चाचणी घेताना वैज्ञानिकांना शरीरात विषाविरुद्ध लढणारे घटक तयार होत असल्याचं दिसलं. त्याचवेळी अश्रूंमध्येही असे घटक असल्याचं लक्षात आलं.


कोब्रा आणि करैतच्या विषावर होणार परिणाम?

काही प्राथमिक अहवालांमध्ये या नॅनोबॉडी कोब्रा, करैत आणि वायपरसारख्या विषारी सापांच्या विषावर प्रभाव दाखवू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अजून पूर्ण वैज्ञानिक सहमती झालेली नाही. त्यामुळे हे दावे सध्या प्राथमिक स्तरावरच मानले जात आहेत.

सध्याच्या अँटीव्हेनममध्ये काय अडचणी आहेत?

आज वापरली जाणारी अँटीव्हेनम औषधं प्रामुख्याने घोडे किंवा इतर प्राण्यांच्या मदतीने तयार केली जातात. ही औषधं थंड ठिकाणी साठवावी लागतात आणि काहीवेळा त्यांच्यामुळे अ‍ॅलर्जीचाही धोका असतो. दुर्गम भागात हीच मोठी समस्या ठरते. वैज्ञानिकांच्या मते, उंटाच्या नॅनोबॉडीवर आधारित तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास भविष्यात अधिक प्रभावी आणि सोप्या पद्धतीने वापरता येणारं औषध तयार होऊ शकतं.

थेट अश्रू वापरणं धोकादायक

सोशल मीडियावर या संशोधनाबाबत अनेक अफवा पसरत आहेत. मात्र, तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे की उंटाचे अश्रू थेट वापरून उपचार करता येणार नाहीत. भविष्यात औषध तयार झालं, तर त्यासाठी वैज्ञानिक प्रक्रिया करून विशेष अँटीबॉडी वेगळ्या काढाव्या लागतील.

Web Title : ऊंट के आंसू: कोबरा जहर के लिए संभावित विषहर, शोध का दावा

Web Summary : ऊंट के आंसुओं में विशेष तत्व, 'नैनोबॉडीज' होते हैं, जो कोबरा के जहर को बेअसर कर सकते हैं। भारतीय और दुबई के वैज्ञानिकों ने शोध के दौरान ऊंट के आंसुओं में ये एंटीबॉडी पाए। इससे विषहर बनाना आसान हो सकता है, लेकिन सीधा उपयोग खतरनाक है; आगे शोध जारी है।

Web Title : Camel Tears: Potential Antivenom for Cobra Poison, Research Claims

Web Summary : Camel tears contain special elements, 'nanobodies,' that may neutralize cobra venom. Indian and Dubai scientists found these antibodies in camel tears during research. These could lead to easier antivenom production, but direct use is dangerous; further research is ongoing.