शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

एका झाडाच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात असतात पोलीस, खर्च होणारी किंमत ऐकून व्हाल आवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 14:47 IST

या झाडाच्या सुरक्षेसाठी तब्बल २४ तास पोलिस असतात.

राष्ट्रपतींपासून पतंप्रधानांपर्यंत किंवा  शासकिय अधिकारी आणि नेते यांच्या सुरक्षेसाठी सिक्युरिटी  सुरक्षा दल असतं.  हे तर तुम्हाला माहित असेल पण आज आम्ही तुम्हाला अशा झाडाबद्दल सांगणार आहोत ज्या झाडाच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च होतात.

या झाडाच्या सुरक्षेसाठी तब्बल २४ तास पोलिस कार्यरत असतात. मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ आणि विदिशा यांच्यामध्ये सलामतपूरमध्ये एक पर्वत आहे. त्या ठिकाणी  हे झाडं आहे. या झाडाला एखाद्या व्हिआयपीप्रमाणे ट्रिटमेंट दिली जाते.  चला तर मग जाणून घेऊया या झाडात असं आहे तरी काय.

या झाडाच्या सुरक्षेसाठी चार ते पाच जवान तैनात करण्यात आले आहेत. या झाडाला पाणी देण्यासाठी नगरपालिकेकडून खास पाण्याचा टँकर येतो. कृषी विभागाचे अधिकारी या झाडाची पाहणी करण्याासाठी  प्रत्येक आठवड्याला येत असतात.  तसचं झाडाची काळजी घेण्यासाठी तसंच सुरक्षेवर १२ ते १५ कोटी रुपये दर वर्षी खर्च होतात. 

हे पिंपळाचं झाड आहे. या झाडाला बोधीवृक्ष या नावाने ओळखलं जातं.  २०१२ मध्ये जेव्हा श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंद्रा यांनी भारत दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी  हे झाड लावलं होतं. असं मानलं जातं की अनेक वर्षांपूर्वी भगवान बुध्दांना याच झाडाखाली ज्ञान प्राप्त झालं होतं. बौद्ध धर्मात या झाडाला खूप महत्व आहे. 

असं मानलं जातं की ई. स पूर्व तिसरा शतक असताना सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बोधी वृक्षाची फांदी देऊन  बौद्ध धर्माचा प्रचार करण्याासाठी श्रीलंकेत पाठवलं होतं. यांनी श्रीलंकेतील अनुराधापुरा येथे हे झाडं लावलं होतं. श्रीलंकेतील हे झाड आजही तुम्हाला पहायला मिळेल.या बोधी वृक्षाच्या खाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.

ते झाडं बिहारच्या गया जिल्ह्यात आहे. अनेकांनी या झाडाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही  हे झाडं नष्ट झालेलं नाही हा चमत्कार समजला जातो. सन १८७६ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे  हे झाडं नष्ट झालं. पण १८८० मध्ये इंग्रज अधिकारी लॉर्ड कनिंघम यांनी श्रीलंकेतील बोधी वृक्षाच्या फांद्या मागवून पुन्हा या झाडाची स्थापना केली. आत्तापर्यंत हे झाडं त्याच ठिकाणी आहे.  तुम्ही या झाडांना कधीही भेट देऊ शकता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके