शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

...म्हणे मोदींनी मला पैसे पाठवलेत! खात्यात चुकून आलेले ५.५ लाख देण्यास ग्राहकाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 4:26 PM

मोदी सरकारनं माझ्या खात्यात पैसे जमा केलेत, मी ते परत करणार नाही; ग्राहकाचा ठाम पवित्रा

पाटणा: बिहारच्या खगडियामध्ये एक अजब घटना घडली आहे. एका बँक ग्राहकाच्या खात्यात चुकून ५.५० लाख रुपये जमा झाले. मोदी सरकारनं मदत म्हणून पैसे खात्यात जमा केल्याचा ग्राहकाचा समज झाला. त्यानं ते पैसे खर्चदेखील केले. बँक अधिकाऱ्यांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी ग्राहकाला पैसे परत करण्यास सांगितलं. मात्र ग्राहकानं नकार दिला. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ग्राहकाला अटक केली.

खगडियामधील बख्तियारपूर ग्रामीण बँकेत रणजीत दास नावाच्या व्यक्तीचं खातं आहे. बँक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे त्याच्या खात्यात ५.५० लाख रुपये जमा झाले. खात्यात पैसे आलेले पाहून दासला आनंद झाला. सरकारनं थेट बँक खात्यात मदत केल्याचा त्याचा समज झाला. त्यानं खात्यात आलेले बरेचसे पैसे खर्चदेखील केले. इतिहासाचं वर्तुळ पूर्ण होणार? रतन टाटा खास मिशनवर; स्पेशल १२ अधिकारी लागले कामाला

बँक अधिकाऱ्यांना त्यांच्या हातून घडलेली चूक लक्षात आली. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी रणजीत दासला पैसे परत करण्यास सांगितलं. त्यावर मला मोदी सरकारनं पैसे पाठवलेत. मी ते परत करणार नाही, असं उत्तर दासनं दिलं. त्यानंतर बँकेनं दासच्या नावानं नोटीस काढली. मात्र त्यानंतरही त्यानं पैसे परत केले नाहीत.

रणजीत दास पैसे करत नसल्यानं बँक अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत दासला अटक केली. पोलिसांना या प्रकरणाचा तपास करत आहेत. दासच्या खात्यात ५.५० लाख रुपये जमा झाले होते. त्यानं ते पैसे खर्च केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.

टॅग्स :bankबँक