गुरूदक्षिणा! बिकट परिस्थितीमुळे कारमध्ये राहणाऱ्या शिक्षकाला माजी विद्यार्थ्याने दिले १९ लाख भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:21 PM2021-03-12T13:21:09+5:302021-03-12T13:22:31+5:30

कॅलिफॉर्निया येथील ही घटना आहे, याठिकाणी एका माजी विद्यार्थ्यांने शिक्षकाला १९ लाख रुपये भेट म्हणून दिले आहेत.

77-year-old substitute teacher who lives in his car gifted $27,000 check by former student | गुरूदक्षिणा! बिकट परिस्थितीमुळे कारमध्ये राहणाऱ्या शिक्षकाला माजी विद्यार्थ्याने दिले १९ लाख भेट

गुरूदक्षिणा! बिकट परिस्थितीमुळे कारमध्ये राहणाऱ्या शिक्षकाला माजी विद्यार्थ्याने दिले १९ लाख भेट

Next
ठळक मुद्देजोस व्हिलुएल नावाचे शिक्षक ज्यांना विद्यार्थी मिस्टर व्ही म्हणून ओळखत होतेमी खूप भाग्नवान आहे, की मला विविध शिक्षणसंस्थांमध्ये शिकवण्याची संधी मिळालीमला चेक मिळाला परंतु तो चेक फार काळ टिकला नाही, कारण माझ्यावर आधीपासून खूप कर्ज होतं

अनेकदा आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात त्या आपल्याला जगणं म्हणजे नेमकं काय याचा अर्थ शिकवत असतात. आपल्या आयुष्यात गुरूचं स्थान किती महत्त्वाचं असतं हे लहानपणापासून शिकवण्यात येते. आजही तुम्हाला शाळेतील अथवा कॉलेजमधील शिक्षक आठवत असतील, असेच एक शिक्षक हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगताना एका माजी विद्यार्थ्याला भेटतात, त्यानंतर शिक्षकाचे जीवन बदलून जाते, सोशल मीडियात सध्या अशी एक घटना व्हायरल होत आहे.(A former teacher who was living in his car was gifted with a $27,000 check by a former student)

कॅलिफॉर्निया येथील ही घटना आहे, याठिकाणी एका माजी विद्यार्थ्यांने शिक्षकाला १९ लाख रुपये भेट म्हणून दिले आहेत. जोस व्हिलुएल नावाचे शिक्षक ज्यांना विद्यार्थी मिस्टर व्ही म्हणून ओळखत होते, वयाच्या ७७ व्या वर्षी ते २१ वर्षाच्या स्टीव्हन नाव्हा नावाच्या विद्यार्थ्याला भेटले. व्हिलुएल अनेक दशकांपासून शिक्षक म्हणून काम करत होते. ते सांगतात की, मी खूप भाग्नवान आहे, की मला विविध शिक्षणसंस्थांमध्ये शिकवण्याची संधी मिळाली, अलीकडेच २०२० मध्ये त्यांनी शाळेतून राजीनामा दिला.

शाळेची परिस्थिती पूर्णपणे बदलली त्यामुळे पर्यायी शिक्षक म्हणून काम करणं बंद करावं असा मला वाटलं, त्यानंतर मे महिन्यात मी नोकरीचा राजीनामा दिला, मी पेन्शनसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली, त्यानंतर मला चेक मिळाला परंतु तो चेक फार काळ टिकला नाही, कारण माझ्यावर आधीपासून खूप कर्ज होतं. त्यानंतर व्हिलुएल हे त्यांच्या कारमध्येच राहू लागले. छोटी कार त्यांच्यासाठी घर बनली, एकेदिवशी कारमधून दुसरीकडे जाताना स्टिव्हन नाव्हा नावाचा माजी विद्यार्थी त्यांच्या गाडीसमोर आला, त्याने व्हिलुएल यांना ओळखले.

यानंतर व्हिलुएल आणि नाव्हा यांच्यात संभाषण झाले, यावेळी व्हिलुएल यांची परिस्थिती पाहून स्टिव्हन नाव्हा याला खूप वाईट वाटले. कोविड १९ मुळे अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागले, आपल्याला शिकवणाऱ्या माजी शिक्षकाची अशी स्थिती पाहून त्यांना मदत करण्याची इच्छा नाव्हा या विद्यार्थ्याला झाली, या संभाषणात नाव्हा याने शाळेत असताना व्हिलुएल यांनी आपल्याला खूप मदत केल्याची आठवण काढली, गणितात व्हिलुएल यांच्या मार्गदर्शनानेच स्टिव्हन नाव्हा उत्तीर्ण होऊ शकला होता.

नाव्हाने सुरुवातीला व्हिलुएल यांना २० हजार रुपये दिले, त्यानंतर व्हिलुएल यांना मदत व्हावी यासाठी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वापर्यंत ही गोष्ट पोहचवली, टिकटॉकवर शेअर केलेल्या स्टोरीला जवळपास १७ लाखाहून अधिकांनी पाहिलं, सोशल मीडियाची शक्ती ही आता खूप मोठी झाली आहे, आपण चांगल्या कामासाठी त्याचा वापर केला पाहिजे असं नाव्हाने सांगितले, या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण पुढे ज्या लोकांना व्हिलुएल यांनी शिकवलं होतं, अशा सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून व्हिलुएल यांच्या सन्मानासाठी कार्यक्रम आयोजित केला, त्यात विद्यार्थ्यांनी अनेक भेटवस्तूसह १९ लाख ५० हजारांचा चेक व्हिलुएल यांना भेट म्हणून दिला.  

Web Title: 77-year-old substitute teacher who lives in his car gifted $27,000 check by former student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.