शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षीय तरूणाचा २० मिनिटांसाठी मृत्यू, मरणाला हुलकावणी देत झाला जिवंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 14:23 IST

एखादी व्यक्ती मरण पावल्यावर जिवंत झाल्याचं तुम्ही सिनेमात पाहिलं असेल, पण प्रत्यक्षात असं काही नक्कीच बघायला मिळत नाही.

(Image Credit : Inside Edition)

एखादी व्यक्ती मरण पावल्यावर जिवंत झाल्याचं तुम्ही सिनेमात पाहिलं असेल, पण प्रत्यक्षात असं काही नक्कीच बघायला मिळत नाही. पण अशी एक आश्चर्यकारक घटना प्रत्यक्षात घडली आहे. मिशिगनमध्ये एका २० वर्षीय तरूणाने मरणाला मात दिली आहे. रिपोर्टनुसार, मायकल प्रुइटला विजेचा झटका लागला होता आणि त्यामुळे त्याचा श्वास तब्बल २० मिनिटांसाठी बंद झाला होता. अशात डॉक्टरांनी त्याला पुन्हा विजेटे झटके देऊन जिवंत केलं.

टाइम्स नाऊ ने दिलेल्या रिपोर्टनुसार, मायकल प्रुइट त्याच्या परिवारासोबत टेलर या ठिकाणी राहतो. मायकल घरात त्याच्या सावत्र वडिलांसोबत काही काम करत होता. यावेळी तो एक धातु पायऱ्यांवरून घेऊन जात होता, अशात एका विजेच्या ताराचा स्पर्श झाला. त्याला विजेचा जोराचा झटका बसला.

(Image Credit : Fox News)

ही घटना घडताच घराच्या मालकाने पोलिसांना फोट केला आणि सीपीआर सुरू केला. पॅरामेडिक्स टीम जवळपास ४ तासांनी पोहोचली आणि रस्त्याने मायकलला डिफिब्रिलेटरचा वापर करून जिवंत करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला. पण अॅम्बुलन्समध्ये त्याचं हृदय एकदाही धडधडलं नाही.

ब्यूमोंट हॉस्पिटलच्या डॉ. एंजल चुडलर यांनी सांगितले की, 'जेव्हा या तरूणाला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं तेव्हा तो जिवंत असल्याचे कोणतेही संकेत मिळत नव्हते'.

हॉस्पिटलच्या अधिकारी बारबरा स्मिथ यांनी सांगितले की, 'पुन्हा जिवंत होण्यापूर्वी मायकल हा २० मिनिटांसाठी मृत होता. त्यांच्यासोबत जे घडलं ते खरंच चमत्कारीकच आहे. कारण मेंदुतील पेशी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मरायला लागतात. त्याला वेळीच सीपीआर देण्यात आल्याने त्यांच्या मेंदुला रक्तपुरवठा व्यवस्थित होत होता. त्याला पुन्हा शॉक देण्यासाठी त्याच्या पायांची बोटे आतून जाळण्यात आलीत'. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय