शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

तिखट चिप्स खाऊन 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 17:04 IST

एका 14 वर्षाच्या मुलाला सोशल मीडियावरील चिप्स खाण्याचं चॅलेंज जीवावर बेतलं आहे. या मुलाने जास्त मसाले आणि तिखट असलेले चिप्स खाल्ले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 

आजकाल सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंज बघायला मिळतात. कधी खाण्याचे तर कधी पिण्याचे. आजकाल सगळीच लहान मुले चिप्स मोठ्या आवडीने खातात. लहान मुलांनी हट्ट केला तर आई-वडील घेऊनही देतात. पण एका 14 वर्षाच्या मुलाला सोशल मीडियावरील चिप्स खाण्याचं चॅलेंज जीवावर बेतलं आहे. या मुलाने जास्त मसाले आणि तिखट असलेले चिप्स खाल्ले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 

या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला याचं कारणही समोर आलं आहे. मुलाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधूनही अनेक खुलासे झाले आहेत. असं समोर आलं की, चिप्समध्ये मोठ्या प्रमाणात तिखट होतं आणि जन्मापासून तो हृदयरोगाने पीडित होता. 

मुलाचं नाव हॅरिस वोलोबा होतं. ते अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्समध्ये राहत होता आणि 10व्या वर्गात शिकत होता. एबीसीच्या रिपोर्टनुसार, मुलाचा मृत्यू 1 सप्टेंबर 2023 ला झाला होता. त्याने Paqui चिप्स खाल्ले होते. चिप्स तयार करणाऱ्या कंपनीने वन चिप्स चॅलेंज सुरू केलं होतं. ज्यात हॅरिसने भाग घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर कंपनीने स्पष्टीकरण जारी करून सांगितलं की, हॅरिसचा मृत्यू दु:खदायक आहे आणि परिवारासोबत आमच्या सद्भावना आहेत. हॅरिसच्या टेस्टनंतर समजलं की, हॅरिसचा मृत्यू  'उच्च कॅप्सायसिन कंसंट्रेशन असलेल्या फूड सब्सटांसच्या सेवनामुळे झाला'.

कॅप्सायसिन मिरचीला तिखट बनवतं. अशा स्थितीत शरीरातून रक्तस्त्राव होऊ शकतो. हृदयाची धडधड वाढते. मेडस्टार वॉशिंग्टन हॉस्पिटल सेंटरचे हृदय एक्सपर्ट डॉक्टर सैयद हैदर म्हणाले की, कॅप्सायसिनमुळे हृदयावर दबाव पडू शकतो. रिपोर्ट्समधून समजलं की, हृदयाच्या गंभीर स्थितीमुळे हॅरिस मिरचीमध्ये असलेल्या केमिकलच्या साइड इफेक्टबाबत संवेदनशील होता. आता या घटनेनंतर लोक तिखट चिप्स खाण्याबाबत चिंता व्यक्त करत आहेत. 

टॅग्स :Healthआरोग्यJara hatkeजरा हटके