शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिका:यांना नोटीस

By admin | Updated: March 17, 2017 00:25 IST

भोरटेक : शाळेची भिंत कोसळून सात महिने उलटले तरी विद्याथ्र्यास मदत मिळेना

कजगाव, ता. भडगाव : भोरटेक  येथे गेल्या वर्षी शाळेची भिंत कोसळून विद्यार्थी जखमी  झाला होता,  मात्र 7 महिने उलटूनही अद्याप या विद्याथ्र्यास वैद्यकीय खर्च मिळत नसल्याने  भोरटेक येथील सरपंच व विद्याथ्र्याच्या  पालकाने जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी                         (जळगाव) यांना वकिलामार्फत नोटीस पाठवून 30 दिवसात नुकसान भरपाई द्यावी अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असे सूचित केले आहे.  भोरटेक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची भिंत 27 जुलै 2016 रोजी  कोसळली होती. यात 4 थी चा विद्यार्थी जखमी झाला होता.  त्याच्या मांडीचे हाड मोडल्याने त्यास चाळीसगावी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमी विद्यार्थी आनंदा धर्मा भिल याची दवाखान्याचे बिल भरण्याची परिस्थिती नसल्याने त्यास मदत देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या दुर्घटनेनंतर लोकप्रतिनिधी  व अधिका:यांनी  घटनास्थळी भेटी दिल्या व मदतीचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अंमलबजावणी अद्यापपयर्ंत झालेली नाही.ना शाळा दुरुस्ती, ना विद्याथ्र्यास मदतगेल्या 7 महिन्यात कोणतीही हालचाल शासन दरबारी होत नसल्यामुळे                   ना शाळा दुरुस्ती होत आहे ना विद्याथ्र्यास मदत मिळत आहे.  यामुळे शेवटी त्रासून भोरटेकचे सरपंच तुकाराम जाधव व विद्याथ्र्याचे पालक धर्मा भिल यांनी नोटीस पाठवून  शारीरिक नुकसान भरपाई 60 हजार रुपये तर आर्थिक नुकसान भरपाई 50 हजार रुपये, मानसिक नुकसानीपोटी 20 हजार रुपये व पुढील भविष्यासाठी 50 हजार रुपये अशी भरपाई  न मिळाल्याने तसेच शाळेच्या इमारतीत कोणतीही सुधारणा केलेली नाही आदी  कारणांमुळे वकिलामार्फत नोटीस पाठविण्यात आली आहे. याप्रकरणी दखल घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.