पाळधी येथील कामगाराचा ग्लानी येवून पडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST2020-12-08T04:13:49+5:302020-12-08T04:13:49+5:30

.......... चोरीची दुचाकी घेवून फिरणाऱ्या दोघांना अटक जळगाव : चोरीची दुचाकी घेवून फिरणाऱ्या दीपक भास्कर सपकाळे (वय २४) ...

A worker from Paldhi died due to grief | पाळधी येथील कामगाराचा ग्लानी येवून पडल्याने मृत्यू

पाळधी येथील कामगाराचा ग्लानी येवून पडल्याने मृत्यू

..........

चोरीची दुचाकी घेवून फिरणाऱ्या दोघांना अटक

जळगाव : चोरीची दुचाकी घेवून फिरणाऱ्या दीपक भास्कर सपकाळे (वय २४) व ईश्वर जगन्नाथ सपकाळे (वय,२८,दोन्ही रा. धामणगाव ता. जळगाव) या दोघांना तालुक्यातील घार्डी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी ८ वाजता अटक केली आहे. या दोघांनी गोविंदा रिक्षा स्टॉप येथून दुचाकी चोरली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, शरद भालेराव, नितीन बाविस्कर, राहुल पाटील यांनी ही कारवाई केली. दोघांना शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

हरीविठ्ठल नगरातून अल्पवयीन मुलीला पळविले

जळगाव : हरीविठ्ठल नगरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही. मुलीच्या वडीलांनी सोमवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

Web Title: A worker from Paldhi died due to grief