कोरोनानंतर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाने टाकली कात :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST2021-02-05T05:58:57+5:302021-02-05T05:58:57+5:30

२) ज‌‌ळगाव ते मनमाड हा रेल्वे प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे ...

Work on the third railway line after Corona is underway: | कोरोनानंतर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाने टाकली कात :

कोरोनानंतर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाने टाकली कात :

२) ज‌‌ळगाव ते मनमाड हा रेल्वे प्रशासनाचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने आखले आहे. मात्र, माहेजी, परधाडे येथील काही शेतकऱ्यांनी रेल्वेकडून योग्य मोबदला न मिळाल्यामुळे जमिनी देण्यास विरोध दर्शवित आहेत. त्यामुळे भूसंपादनाच्या कामाला विलंब होत असून, पर्यायाने या प्रकल्पालाही विलंब होत आहे. यातून तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

३) जळगाव ते मनमाड यास १६० किलोमीटरच्या मार्गावर शिरसोलीपर्यंत ११ लहान पूल व तीन मोठे पूल उभारण्याचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले आहे. रेल्वेतर्फे मनमाडपर्यंत आधी पूल उभारण्यात येणार असून, २०२४ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वेळेत हे काम पूर्ण झाल्यास मुंबईकडे जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असून, नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे गाड्या विलंबाने धावण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

Web Title: Work on the third railway line after Corona is underway: