शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

ऐनपूरच्या महिलांचा ‘एल्गार’

By admin | Updated: July 4, 2017 01:11 IST

गावातच काय शिवारातही दारू दुकान नको : महिलांची जिल्हाधिका:यांकडे मागणी

जळगाव :  दारू पिऊन नवरा, मुलगा मारहाण करतो. दारूचे व्यसन करण्यासोबतच सोरटवरही पैसे उडवतात. त्यामुळे गावातील दारू दुकाने बंद करा. गावातच काय पण गावाच्या शिवारातही दारू दुकान नको, अशी भूमिका ऐनपूर ता.रावेर येथील महिलांनी जिल्हाधिका:यांकडे मांडली. पोलीस, तहसील कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभाग या दारू दुकानांच्या बाजूने आहेत, असे चित्र असल्याने जिल्हाधिका:यांनीच न्याय देण्याची मागणीही केली. जिल्हाधिका:यांनी प्रतिवादी दारू दुकान मालकांच्या वकिलांना बाजू मांडण्यासाठी मंगळवार, 4 रोजी सकाळी 10 वाजेची वेळ दिली आहे. दारु पिऊन मारहाणऐनपूर ता.रावेर येथे दोन देशी दारूची दुकाने तर एक परमिट रूम आहे. त्यामुळे गावातील युवक, वयस्कर व्यक्तीही व्यवसानाधीन झाले आहेत. दारू पिऊन जवळ असलेल्या सोरटच्या अड्डय़ावर जाऊन पैसे उधळायची सवय अनेकांना लागलीय. दारू पिऊन घरातील आई, प}ी, बहीण, मुले यांना मारहाण करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. त्यामुळे गावातील महिलांनी कंटाळल्या आहेत. ही दारू दुकाने बंद करावीत, अशी मागणी करीत ऐनपूर येथील मातोश्री रमाबाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे जिल्हाधिका:यांना, राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने 7 जून 2017 रोजी चौकशीसाठी आलेल्या अधिका:यांसमोर ऐनपूर गावातील हजाराहून अधिक महिल्या जमल्या. त्यांनी स्वाक्षरी करून या दारू दुकानांना विरोध नोंदविणे सुरू केले. त्यावेळी अधिका:यांनीच सह्या पुरे झाल्या असे सांगितले. नंतर मात्र 726 महिलाच दारूबंदीची मागणी करण्यासाठी आल्या होत्या असा दावा केला. सुनावणीसाठी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित तक्रारींच्या अनुषंगाने 3 जुलै रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिका:यांसमोर सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यात दारू दुकानदारांना वकिलांमार्फत अथवा स्वत: बाजू मांडण्यास सांगण्यात आले होते. यावेळी गावातील मोठय़ा संख्येने महिलादेखील उपस्थित होत्या. या महिलांनी प्रशासकीय यंत्रणा दारू दुकानदारांच्या बाजूने काम करीत असल्याची तक्रार जिल्हाधिका:यांकडे केली. त्यावर जिल्हाधिका:यांनी मतदान घेऊन दारू दुकाने गावाबाहेर हलविली जातील, असे सांगितले. त्यावर या महिलांनी गावातच काय गावाच्या शिवारातही दारू दुकाने नको, अशी भूमिका घेतली. यावेळी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी हेदेखील उपस्थित होते.आज मतदानाची तारीख देणारदारू दुकानदारांच्यावतीने अॅड.भरत गुजर व प्रतिनिधींनी बाजू मांडली. त्यात समन्स मिळाले, पण त्यात तक्रार नक्की काय आहे? ते कळालेले नाही. तसेच ठराव कोणी केला? किती संख्येने केला? त्या महिला ग्रा.पं.च्या मतदार आहेत का? याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी त्यांना मंगळवार, 4 रोजी सकाळी 10 वाजता बाजू मांडण्याची वेळ दिली. याचवेळी दारू दुकानांविरोधात मतदान घेण्यासाठीची तारीखही दिली जाणार आहे.