शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सबळ पुराव्यानिशी  दोषारोप सादर करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 11:07 PM

रावेर हत्याकांड : जिल्हा पोलीस अधीक्षक  मुंढे यांची माहिती

रावेर : सबंध देशभरात घडलेल्या अत्यंत संवेदनशील गुन्ह्यांपैकी कमालीची गंभीरता असलेल्या पिडीतेसह चौघा बालकांच्या हत्याकांडाच्या  गुन्ह्य़ात आरोपी महेंद्र सिताराम बारेला (वय १९ वर्षे) रा. केऱ्हाळे बुद्रुक ता. रावेर यास पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. सदरच्या गुन्ह्यात सदर आरोपीचा १०० टक्के सहभाग असल्याचे शास्त्रीय पुरावे प्राप्त झाले आहेत. ६० दिवसांपुर्वी  सर्वपुराव्यांनिशी न्यायालयात या गुन्ह्यातील दोषारोप ठेवणार असून या गुन्ह्यात आरोपीला निश्चित सजा होणार असल्याचा आत्मविश्वास पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत प्रकट केला. रावेर शिवारातील बोरखेडा रस्त्यालगत असलेल्या १४ वर्षीय पिडीतेसह तिच्या चौघा भावंडांची बालहत्याकांडातील गुन्ह्याच्या तपासाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत  मुंढे बोलत होते.  सामुहिक बलात्काराचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता, या तपासाला बाधा निर्माण होईल, अशा प्रकारची तपासातील माहिती या गुन्ह्याचे दोषारोप न्यायालयात दाखल होईपर्यंत आपणासमोर उघड         करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान मयतांमधील बालिकेवर अत्याचार झाल्याबाबत कोणताही वैद्यकीय  पुरावा तपासात निष्पन्न झाला नसल्याची बाब निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  तर आरोपीस शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.