शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या चेअरमनवर का नाही गुन्हा?

By admin | Updated: March 7, 2017 23:30 IST

प्रीती मेनन यांचा सवाल: केवळ प्रसिद्धी व त्रास देण्यासाठी माझ्याविरुद्ध दाखल केला खटला

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एका शाखेत ७३ लाखांच्या जुन्या नोटाबदली प्रकरणी सीबीआयने बँकेच्या कार्यकारी संचालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीबीआयने या कारवाईत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्या चेअरमन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल आम आदमी पार्टीच्या राज्य संयोजिका प्रीती मेनन यांनी केला आहे.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल आहे. या खटल्याच्या कामकाजासाठी त्या मंगळवारी आल्या असता त्यांनी जळगावात ‘लोकमत’शी वार्तालाप केला. जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेची चौकशी झाली तसेच अन्य शाखांमध्ये काय झाले याची चौकशी कोण करणार ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. खटला केवळ त्रास देण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत फोनवर बोलणे झाल्याचा आरोप हॅकर मनीष भंगाळे याने केला होता. त्यानंतर दोन आठवडे झाले तरी कारवाई न झाल्याने आपण कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे खडसे यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल केला होता. खटल्यातून काही निष्पन्न होणार नाही. मात्र केवळ प्रसिद्धीसाठी व आपल्याला त्रास देण्यासाठी हा खटला दाखल केला आहे. त्यामुळे न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया जात असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे मंत्रीपद गेलं, त्याचीशी आम्हाला काही घेणं देणं नाही. ज्यांनी चूक केली आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे एवढेच आमचे म्हणणे आहे. मात्र भाजपा मंत्र्यांना तत्काळ क्लिन चिट देणाºया या सरकारकडून आम्हाला फार अपेक्षा नसल्याचे त्यांनी म्हटले.भ्रष्टाचार केवळ मुंबई मनपामध्येच आहे का?शिवसेना व भाजपा हे सत्तेत राहण्यासाठी काहीही करतात. शिवसेना म्हणते भाजपा भ्रष्टाचारी तर भाजपा म्हणते शिवसेना भ्रष्टाचारी आहे. दोन्ही पक्ष भ्रष्टाचारी आहेत तर शिवसेना व भाजपाची राज्यात व केंद्रात युती कशासाठी आहे. केवळ मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे का? राज्यात पारदर्शी कामकाज सुरू आहे का? असा सवाल त्यांनी केला.