शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबाद ग्रामपंचायतीचा नवा कारभारी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

ममुराबाद : गावातील सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) संवर्गासाठी राखीव निघाल्याने ग्रामपंचायतीची धुरा नेमकी कोणाकडे जाते? त्याकडे आता ...

ममुराबाद : गावातील सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) संवर्गासाठी राखीव निघाल्याने ग्रामपंचायतीची धुरा नेमकी कोणाकडे जाते? त्याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सरपंचपदासाठी इच्छुकांकडून सदस्यांची जुळवाजुळव सुरू झाली असून निवडणुकीची तारीख घोषित होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.

सहा वॉर्डातील १७ जागांसाठी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या आरक्षणाकडे नवनिर्वाचित सदस्यांसह त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले होते. गेल्या वेळी सरपंचपदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. यंदा नेमके कोणते आरक्षण निघते ? त्याबद्दल संबंधितांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सरपंचपदाचे आरक्षण मनाजोगते निघावे म्हणून अनेकांनी देव पाण्यातसुद्धा ठेवले होते. त्यातील काहींनी अंदाज बांधून आरक्षण घोषित होण्यापूर्वी मोर्चेबांधणीही सुरू केली होती. प्रत्यक्षात सरपंचपदाचे आरक्षण नेमके नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने अनेकांच्या आशेवर सपशेल पाणी फेरले गेले. तर ज्यांच्या मनासारखे आरक्षण निघाले त्यांच्या आनंदास पारावर राहिला नाही. प्राप्त माहितीनुसार गावात नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव पुरुषाच्या जागेवर फक्त दोनच सदस्य निवडून आले आहेत. वॉर्ड एकमधून यंदा सहाव्यांदा निवडलेले हेमंत गोविंद चौधरी आणि वॉर्ड दोनमधून यंदा प्रथमच निवडलेले शैलेंद्र यशवंत पाटील या दोघांचा त्यात समावेश आहे. दुसरीकडे ओबीसी जागेवर महिलासुद्धा दावा करू शकतात, असा मतप्रवाह निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने कायदेशीर बाबींची चाचपणी काहींनी सुरू केली आहे.

---------------------

- १७ पैकी निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांचे संख्याबळ जमवून कोण सरपंचपदी विराजमान होते त्याची उत्कंठा ग्रामस्थांमध्ये आहे.

- निवडणुकीची तारीख घोषित होताच संबंधित सर्व सहलीला रवाना होण्याच्या तयारीत आहेत. प्रमुख दावेदार उमेदवारांनी त्याकरिता जय्यत तयारीदेखील करून ठेवली आहे.